Breakingआकुर्डी : निकृष्ट कामामुळे रस्त्याचे डांबर वाहून गेले, उरली खडी; ठेकेदारावर कारवाई करण्याची डीवायएफआय मागणी


डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) ची मागणी 


आकुर्डी : निकृष्ट कामामुळे रस्त्याचे डांबर वाहून गेले, उरली खडी असताना प्रशासनाने डांबरीकरणाच्या गुणवत्तेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) चे सचिव अमिन शेख यांनी केली आहे.

गंगानगर प्राधिकरण येथील रेल्वे लाईनच्या समांतर असलेल्या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण दोन आठवड्यापूर्वी करण्यात आले होते. मात्र पहिल्याच पावसात या रस्त्याची दुरावस्था झाली. 


संपूर्ण रस्त्याचे डांबर वाहून गेले आहे, आणि रस्त्यावर खडी उरली आहे. ठेकेदाराने अतिशय निकृष्ट मटेरियल वापरून काम पूर्ण केले आहे. रस्त्यावरचे डांबर उडाल्यामुळे  राहादरीस धोका निर्माण झाला आहे.

निकृष्ठ काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी आणि रस्त्याचे पुन्हा डांबरीकरण करावे, अशी मागणी डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) चे कॉम्रेड अमिन शेख, गौरव पानवलकर, प्रसाद जगताप यांनी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा