Breakingआळंदी ही संतांची भूमी आहे, येथून सामाजिक परिवर्तनाच्या लढाईची प्रेरणा मिळते - बाबा कांबळेपुणे : संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, जनाबाई , चोखामेळा, संत रोहिदास महाराज यांनी रूढी परंपरा कर्मकांड अंधश्रद्धा यातून जनतेला मुक्तीचा मार्ग दिला हे विश्वची माझे घर ऐसी मति जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण जहाला असा विश्वाला शांतीचा संदेश ज्ञानेश्वर महाराजांनी दिला. महाराष्ट्रात संतांची मोठी परंपरा आहे, संत परंपरेमुळे महाराष्ट्र हा अंधश्रद्धा मधून बाहेर पडून पुरोगामी म्हणून ओळखला जातो. आळंदीस संतांची भूमी आहे. संताच्या या पावन भूमीतून समाज परिवर्तनाची लढाई लढण्याची प्रेरणा मिळते. यामुळे या देशातील शोषित कष्टकरी बहुजन वर्गांना न्याय मिळवून देण्याची प्रेरणा घेऊन हा लढा  पुढील काळामध्ये व्यापक करू, असे मत महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी आळंदी येथे बोलताना व्यक्त केले.


महाराष्ट्र रिक्षा पंचायत, रिक्षा ब्रिगेड, आणि टपरी पथारी हातगाडी पंचायत या संघटनांच्या वतीने आळंदी येथील समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा येथे पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. आळंदी शहराचे माजी नगराध्यक्ष डी. डी. भोसले पाटील यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी आळंदी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश कुराडे, आळंदी वाहतूक शाखेचे साहेब सह्य पोलीस निरीक्षक, अनिल रिबिके, महिला आघाडीच्या नेत्या आशा कांबळे, अनिता सावळे, गौरी शेलार, जयश्री एडके, मधुरा डांगे, जयश्री रिक्षा ब्रिगेडचे प्रमुख  बाळासाहेब ढवळे, कार्याध्यक्ष लक्ष्मण शेलार आदी उपस्थित होते.


यावेळी रिक्षा ब्रिगेड पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी धनंजय कुदळे, उपाध्यक्ष विजय ढगारे, अनिल शिरसाट, कार्याध्यक्ष संजय दौंडकर, जाफर शेख, प्रवक्ते अविनाश जोगदंड, सह उपाध्यक्ष सिद्धेश्वर सोनवणे, खलील मकानदार, सह कार्याध्यक्ष निखिल येवले, रवींद्र लंके, अजय साळवे, संघटक समीर इनामदार, दीपक कुसाळकर, प्रदीप अहिरे, सोमनाथ आवारे, चिखली विभाग प्रमुख तुषार लोंढे, पुनावळे विभाग प्रमुख सोमनाथ शिंदे, यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.


यावेळी डी. डी. भोसले म्हणाले, एखाद्या प्रश्नांवर एखाद्या विषयावर सातत्याने अभ्यास करून तो लढा पुढे कसा घेऊन जायचा? हे कष्टकऱ्यांची ज्यांचं व चळवळ चालवणाऱ्या बाबा कांबळे यांच्याकडून शिकलं पाहिजे. बाबा कांबळे त्या अनेक वर्षे आळंदीमध्ये धार्मिक शिक्षण घेत होते. तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. रँडी शहरात भोकर जून व्हावे तसेच रिक्षा त्यांचे प्रश्न मार्गी लागावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.


प्रकाश कुराडे म्हणाले, बांधकाम मजुरांसाठी गेल्या अनेक वर्षापासून आम्ही काम करत आहोत. पुढील काळात देखील आळंदी शहरातील बांधकाम मजुरांचे आणि इतर कष्टकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी आपण सर्व मिळून एकत्र काम करू, असे प्रकाश कुराडे म्हणाले.


सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल रिबिके, यांनी रिक्षाचालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे तसेच नियमितपणे खाकी ड्रेस घातला पाहिजे असे म्हणत खाकी घालण्याचा मान पोलिसांना नंतर रिक्षाचालकांना मिळाला आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःला कमी लेखू नका. खाकी ड्रेस घातल्यास तुम्ही शोभून दिसतात, नागरिकांशी सौजन्याने वागा, भाडे नाकरू नका, अशा प्रकारे मार्गदर्शन केले.


कार्यक्रमाच्या आयोजनासाठी टपरी पाथरी पंचायतचे आळंदी व पुणे जिल्हा अध्यक्ष मल्हारभाऊ काळे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत उपाध्यक्ष सुरेश सोनवणे सिद्धेश्वर सोनवणे, दिनेश तापकीर, स्टँड अध्यक्ष सहजी तापकीर, संभाजी गवारे, शिवाजी प्रमोद शेलार, प्रमोद काटे परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा