Breakingमंचर : अवसरी खुर्द येथे शिवनेरी जम्बो कोविड सेंटरचे लोकार्पणमंचर : आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील शिवनेरी जम्बो कोविड सेंटरचे उद्घाटन आज (ता. १३ जून) रोजी करण्यात आले. अवसरी खुर्द येथील तंत्रनिकेतन महाविद्यालय बंद असल्यामुळे येथील वसतिगृहाची जागा कोविड सेंटरसाठी वापरण्यात आली आहे.


मागच्या वर्षी जेव्हा लॉकडाऊन झाला, तेव्हा खेड्यापाड्यात रुग्ण नव्हते. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात देखील रुग्ण वाढायला लागल्यानंतर शासकीय यंत्रणाही सज्ज झाली. या पार्श्वभूमीवर अवसरी खु. येथे शिवनेरी जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. या जम्बो कोविड सेंटरमध्ये २८८ बेड असून त्यापैकी २४० ऑक्सिजन, ४८ आयसीयू बेड, ४० व्हेटिंलेटर आणि लहान मुलांच्या उपचारासाठी विशेष व्यवस्था असणार आहे.या कोविड सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी खेडचे आमदार दिलीपअण्णा मोहिते पाटील, शिरुरचे आमदार अशोकबापू पवार, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, माजी आमदार पोपटराव गावडे व काकासाहेब पलांडे तसेच ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी व पुणे जिल्ह्यातील उद्यमी जगत व स्वयंसेवी संस्थांमधील मान्यवर उपस्थितीत होते.


रुग्णांना जेव्हा ऑक्सिजन किंवा व्हेटिंलेटरची गरज लागायची तेव्हा धावपळ करावी लागत असे मात्र, आता शिवनेरी जम्बो कोविड सेंटरमुळे कोविड रुग्णांना जवळच ऑक्सिजन व व्हेटिंलेटरची सुविधा मिळणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा