Breakingअमरावती : महाराष्ट्रातील आशा - गटप्रवर्तक 15 जून पासुन बेमुदत संपावर जाणार - सुभाष पांडे


महाराष्ट्र राज्य आशा - गटप्रवर्तक कृति समितीच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातही सहभागी होणार !


अमरावती, दि. ९ :  महाराष्ट्र राज्य आशा गट प्रवर्तक कृति समितीने आशा वर्कस् च्या प्रश्नांकडे व प्रलंबित मागण्यांकडे सातत्याने राज्यसरकारकडे मागण्यांचा पाठपुरावा करुन सुध्दा त्याकडे सरकारने सतत दुर्लक्ष केले आहे. कोव्हीड काळात जिवावर उदार होवून आशा कर्मचाऱ्यांनी कार्य करुन सुध्दा त्यांच्यावर अजुन कामाचा बोजा लादुन कामाचे तास वाढविले परंतु मोबदल्याबद्दल शासनाने कोणताही निर्णय घोषीत केला नाही. या सर्व बाबीमुळे आशा वर्कर्स मध्ये असलेल्या असंतोषाची जाणीव सरकारला व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्य आशा - गट प्रवर्तक कृति समिती च्या वतीने 31 मे रोजी मुख्यमंत्र्यांना 15 जुन पासुन महाराष्ट्रातील 70 हजार आशा संपावर जाणार असल्याची माहिती आशा व गटप्रवर्तक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ. सुभाष पांडे यांनी दिली.

सीटु च्या वतीने हे मनपा आयुक्त तसेच मुख्यकार्यपालन अधिकारी , जिल्हा परिषद यांना संपाची नोटीस देण्यात आली असल्याचेही म्हटले आहे.

तसेच पांडे म्हणाले, मुख्यमंत्र्याच्या नावे शासनाला संपाची नोटीस दिल्यानंतर 4 जुनला आरोग्य विभागाने कृति समितीच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलविले होते. त्या बैठकीत आशांच्या सर्व प्रश्नांबाबत व मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. अधिकाऱ्यांनी स्पष्ट आश्वासन न देता सरकारसोबत चर्चा करुन निर्णय घेण्याचे सुचित केले. तसेच मुख्यमंत्र्यांनी सोमवार दि .7 जुन 2021 रोजी महाराष्ट्रातील सर्व आशांसोबत ऑनलाईन चर्चा केली त्यांचे प्रश्न विचारले व त्यांच्या जबाबदाऱ्या सुध्दा त्यांना सांगितल्या. परंतु आशांच्या मानधना बाबत व कामाचा ओझा कमी करण्याबाबत कोणताही निर्णय दिला नाही. या सर्व बाबींचा विचार करता सरकार आशांकडून कामाची अपेक्षा करते. परंतु त्यांच्या मागण्यांबाबत सातत्याने दुलर्भ करत असल्याचेही ते म्हणाले.

■ आशा व गटप्रवर्तकांच्या मागण्या पुढीलप्रमाणे : 

● आशा व गटप्रवर्तक यांना शासकीय कर्मचारी चा दर्जा द्या. सामाजिक सुरक्षा, पेन्शन, मेडीकल्स योजना लागु करण्यात यावी. 

● 45 व्या श्रम आयोगाच्या शिफारशीनुसार आशा व गटप्रवर्तक यांना किमान वेतन 22000 रुपये लागु करण्यात यावे. 

● ग्रामपंचायतीच्या उपलब्ध निधीतून आशा व गटप्रवर्तक यांना 1000 प्रोत्साहन भत्ता मागील फरकासहित ( एप्रिल 2020 ) देण्यात यावा. 

● कोवीड लसीकरण ड्युटी आशांना बंधनकारक नाही तरीही ड्युटी लावण्यात येत आहे. त्यासाठी मानधनाची विशेष तरतुद करण्यात यावी. प्रती दिवस प्रती आशा / गटप्रवर्तक 500 रुपये भत्ता मिळावा.

● आशा व गटप्रवर्तकांना मास्क, ग्लोज, सॅनिटायझर ची पूर्तता नियमित करावी व ऑक्सिझन व तापमान मीटर यंत्रसाठी आवश्यक असणारे संल ही मुबलक प्रमाणात देण्यात यावे. 

● आशांना कोणतेही तांत्रिक प्रशिक्षण दिलेले नसताना कारोनाच्या स्वाब टेस्ट ची ड्युटी लावण्यात येऊ नये.

● कोरोनाच्या कामासाठी आशा व गटप्रवर्तकांना प्रतिदिन 300 रुपये मोबदला देण्यात यावा.

● कोरोनाने बाधित होऊन मृत्यु झाल्यास 50 लाखाचा विमा मंजूर करण्यात आला आहे, परंतु या संदर्भातील कार्यवाही मात्र आपल्या राज्यामध्ये कोणत्या प्रकारे झाली नाही, आशा व गटप्रवर्तकांचे विम्याचे फॉर्म भरून घेऊन पुढील कार्यवाहीचे आदेश पारित करण्यात यावेत. 

● गटप्रवर्तकांना गृहीत धरून आशा करत असलेल्या सर्व कामाचे नियोजन व रिपोर्टिंग गटप्रवर्तकांना करावे लागत आहे तसेच कोविड 19 लसीकरण केंद्रावर 9 ते 6 ड्युटी करावी लागत आहे , त्याचे प्रती दिवस प्रती गटप्रवर्तक 500 रुपये भत्ता देण्यात यावा.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा