Breaking

अमरावती : २२ जून रोजी आशा व गटप्रवर्तकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, अंगणवाडी कर्मचारी होणार सहभागी


अमरावती, दि. २० : आशा व गटप्रवर्तकांचा उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती अगंणवाडी कर्मचारी संघटना (सीटू) चे रमेश सोनुले, तसेच सुभाष पांडे यांनी दिली.


आशा व गटप्रर्वतकांचा १५ जून २०२१ पासूून राज्यव्यापी बेमुदत संप सुरू आहे. अंगणवाडी कर्मचारी संघटनेने राज्ययत सक्रीय पाठींबा दिला आहे. आशा संघटनांंच्या कृती समितीच्या शिष्टमंडाळाच्या नेत्यांंसोबत दि. १७ जून २०२१ ला मंत्रालयात झालेली चर्चा निष्फळ ठरल्यामुळे तसेच शरद पवार यांच्या सोबतची चर्चा देखाल निष्फळ ठरली आहे. त्यामुळे संप अधिक प्रभावी करण्याचे ठरले आहे. 

दोन्ही संघटनांच्या संयुक्त कृती समितीत ठरल्या असून उद्या सर्व महाराष्ट्राभर मोर्चा, धरणे, निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा