Breaking
आपटाळे : प्राथमिक आरोग्य केंद्र आपटाळे अंतर्गत उपकेंद्र पाडळी येथे कोविड १९ प्रतिबंधात्मक लसीकरण संपन्नआपटाळे (जुन्नर) : प्राथमिक आरोग्य केंद्र आपटाळे अंतर्गत उपकेंद्र पाडळी येथे कोविड १९ प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम (२५ जून) रोजी यशस्वी रित्या पार पाडण्यात आली. यावेळी २७५ नागरिकांना लस देण्यात आली.लसीकरणाची तयारी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. प्रदीप गोसावी, तसेच डॉ. हेमलता शेखरे, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या लसीकरणासाठी पाडळी उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. महानंदा फड, आरोग्य सहाय्यक शेरकर, आरोग्य सेवक दिपक राऊत, आरोग्य सेविका निता मुसळे, आशा वर्कर कार्यतत्पर होते. लसीकरणासाठी पाडळी व इतर ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा