Breaking
आशा वर्कर्स आक्रमक : आशा वर्कर बाबत अश्लील टिप्पणी करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी


नागपूर : सीआयटीयु तर्फे जागोजागी निषेध आंदोलन करून विविध जागी तक्रार नोंदवल्या आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या फेसबुक लाईव्ह वर आशा वर्कर यांना अँटीजन तपासणी बाबत प्रशिक्षण देऊन आशा वर्कर कडून तपासणीचे काम करून घेणे बाबत वक्तव्य केलं. त्यावर फेसबूक व एका व्यक्तीने अश्लील कमेंट केली, त्याच आज (दि.३१ मे) महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक फेडरेशन सीआयटीयु वतीने राज्यभर निषेध दिवस पाळण्यात आला. 


नागपूर मध्ये सुद्धा आशा वर्कर यांनी आशा वर्कर/ महिलांवर अर्वाच्च शब्दांचा वापरनाऱ्या व्यक्तीच्या विरोधात आरोग्य केंद्र समोर हातात फलक निषेधाचे फलक व सीटू चां झेंडा घेऊन एकत्रितपणे निषेध केला. त्याच्याबरोबर त्या विभागातील पोलीस स्टेशनला जाऊन त्या पोलीस स्टेशन मधील पोलीस निरीक्षक यांना दोषींवर कारवाई करण्याचे पत्र सादर केले.


त्याचप्रमाणे नागपूर जिल्हा कमिटीतर्फे जिल्हाधिकारी,  पोलीस अधीक्षक यांनासुद्धा दोषीवर कारवाई करण्याचे पत्र सादर केले. या आंदोलनाचे नेतृत्व राजेंद्र साठे, प्रीती मेश्राम, रंजना पौनिकर, कांचन बोरकर, शालिनी सहारे, हेमलता हातीठेले, सपना मेश्राम, गीता बोंद्रे, रंजना सहारे, पुष्पा पुट्टेवार यांनी केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा