Breaking

आशा व गटप्रवर्तकांची छगन भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी, आमदारांनीही दिले निवेदन


नाशिक, दि. १९ : आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन गटप्रवर्तक व आशा संपाच्या मागण्यावर चर्चा केली. यावेळी भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांच्याशी चर्चा करून मागण्यावरती निर्णय घेण्यासाठी सांगतो, असे आश्वासित केले.


तसेच आशा व गटप्रवर्तकांनी आमदार सीमा हिरे व आ. हिरामण खोसकर यांना निवेदन दिले. त्यांनी काँग्रेस चे राज्य अध्यक्ष नाना पटोले व मंत्री जेष्ठ काँग्रेस नेते ना. बाळासाहेब थोरात यांच्याची बोलून मार्ग काढू असे, आश्वासन दिले.


आशा व गटप्रवर्तक कृती समितीच्या वतीने पुकारलेला संप मागण्या मान्य होई पर्यंत सुरू राहणार आहे, असे आवाहन कृती समिती व आयटक संलग्न आशा व गट प्रवर्तक संघटना (आयटक) राज्य अध्यक्ष कॉम्रेड राजू देसले यांनी केले आहे.

■ मागण्या पुढीलप्रमाणे : 

● आशा व गटप्रवर्तकांंना किमान वेतन द्या.  

● महाराष्ट्र सरकार ने त्वरित दरमहा मानधनात वाढ करावी.

● कोरोना कामाचा प्रोत्साहन भत्ता राज्य सरकारने प्रतिदिन  300 रुपये आशा व गट प्रवर्तकांना द्या.


●  गटप्रवर्तकांचा समावेश सुसूत्रीकरणात करून कंत्राटी कर्मचारी इतके वेतन द्या.

● शासनाच्या नोकर भरतीत ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी प्रमाणे गट प्रवर्तक, आशाना प्राधान्य देऊन, जिल्हा परिषद, मनपा नोकर भरतीत  जागा राखीव ठेवा.

● जननी सुरक्षा योजना (JSY) चा लाभ सरसकट द्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा