Breaking
औरंगाबाद : समाजमाध्यमावर आशा स्वयंसेविकांबाबत अश्लील कमेंट करणाऱ्यांवर कारवाई करा, आशा संघटनेची मागणी


औरंगाबाद, दि .४ जून : समाजमाध्यमावर आशा स्वयंसेविकांबाबत अश्लील कमेंट करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आशा संघटनेतर्फे पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलेल्या एका निर्णयानंतर सोशल मिडियावर आशा व गटप्रवर्तक यांच्यावर अश्लील कमेंट करण्यात आली. या दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी, यासाठी जिल्ह्यातील सीटू संघटनेच्या आशा व गटप्रवर्तक यांनी जिल्हा परिषद सीईओ तसेच महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांना निवेदन देण्यात आले. 

यावेळी सीटू चे कॉम्रेड दामोदर मानकापे, कॉम्रेड मंगल ठोंबरे, कॉ. पुष्पा सिरसाट, कॉ. पुष्पा पैठणे, कॉ. संगीता जोशी, कॉ. सुनिता दाभाडे, कॉ. सुवर्णा शिरसाट यांची उपस्थिती होती.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा