Breakingबीड : स्व.वसंतराव नाईक चौकाचे वडवणी तालुका पत्रकार संघाने केले सुशोभीकरण


महाराष्ट्रातील पत्रकारांचे आधारवड एस.एम.देशमुख यांच्या हस्ते केले लोकार्पण


वडवणी, दि. ३० : वडवणी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांच्या चौकाचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले होते. वडवणी तालुका पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी चौकाचे सुशोभीकरण करण्याचे ठरवले. उद्या १ जुलै रोजी स्व.वसंतराव नाईक यांची जयंती संपुर्ण महाराष्ट्रात कृषीदिन म्हणुन साजरी केल्या जाते‌. जयंतीच्या अगोदर दखल घेत वडवणी तालुका पत्रकार संघाने चौकाच्या रंगरंगोटीचे काम हाती घेऊन ते पुर्ण करण्यात आले.

दिनांक २९ जून रोजी हरीत क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक यांच्या चौकाचे पूजन व ध्वजारोहण मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त व महाराष्ट्रातील पत्रकारांचे आधारवड, एस. एम. देशमुख यांच्या हस्ते करून लोकार्पण करण्यात आला.

यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, ज्येष्ठ पत्रकार सुभाषराव वाव्हळ, शिवसेना तालुकाप्रमुख विनायक मुळे, भाजपाचे ज्येष्ठ नेते बन्सी भाऊ मुंडे, भाजपाचे युवा नेते बाबरी मुंडे, भाजपाचे युवानेते संजय आंधळे, रिपाई तालुका अध्यक्ष महादेव उजगरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग मस्के, युवा नेते दत्तात्रय जमाले, वचिष्ठ शेंडगे, उद्धव काकडे, नरेंद्र राठोड, शांतीलाल पवार, अजय राठोड, वडवणी तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष जानकीराम उजगरे, तालुका अध्यक्ष बाबुराव जेधे, पत्रकार विनोद जोशी, पत्रकार जगदीश गोरे, पत्रकार भैय्यासाहेब तांगडे, पत्रकार रामेश्वर गोंडे, पत्रकार बबलू कदम, पत्रकार अविनाश मुजमुले, पत्रकार लहू खारगे, यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होता. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा