Breakingबीड : शिवसैनिकांमध्ये रस्त्यावरच तुफान राडा, शहर प्रमुखाला जबर मारहाणबीड : बीडमध्ये शिवसैनिकांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. शिवसेनेचे माजलगाव तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांची दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी वर्णी लागली. या निवडीला शहर प्रमुखांनी विरोध केला होता. यावरून ही हाणामारी झाली.

 

अप्पासाहेब जाधव यांची जिल्हा प्रमुख पदावर नियुक्ती केल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी शहरात जंगी तयारी करण्यात आली होती. तसेच यावेळी रॅली काढण्यात आली होती. जिल्हा प्रमुखांच्या निवडीच्या विरोधाचा राग मनात धरून आप्पासाहेब जाधव व त्यांच्या समर्थकांनी माजलगाव शिवसेना शहर प्रमुख धनंजय सोळंके यांना भररस्त्यात चाबकाने मारहाण केली.


यावेळी जाधव आणि सोळंके या दोन्ही गटातील शिवसैनिकांमध्ये रस्त्यावरच तुफान हाणामारी झाली, यात काठ्या, तांबी आणि बेल्टाने एकमेकांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये धनंजय सोळंके तसेच, कर्तव्यावर असलेला एक पोलीस कर्मचारी देखील गंभीर जखमी झाला आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा