Breakingबेंजामिन नेतान्याहू सत्तेतून पायउतार, उजव्या - डाव्या अशा भिन्न आघाडीचे इस्रायल मध्ये नवे सरकार

नवे पंतप्रधान नप्ताली बेनेट 
जेरुसलेम : सलग १२ वर्षे इस्रायलच्या पंतप्रधानपदी राहिलेले बेंजामिन नेतान्याहू यांना अखेर सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. इस्रायलच्या संसदेने रविवारी यामिना पक्षाचे प्रमुख नफ्ताली बेनेट यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारला कौल दिला. स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी नेतान्याहू यांनी सलग १२ वर्षे युद्धखोर भूमिका घेतली, त्यामुळे इस्रायलच्या जनतेला सतत युद्धाच्या छायेत जगावे लागत होते. पॅलेस्टाईन आणि इस्रायल मधील संघर्ष शांततेने सोडवण्यात त्यांना अपयश आले. गेल्या महिन्यातील हमास विरोधातील संघर्षात पॅलेस्टाईन मधील लहान मुले, महिला यांच्या मृत्यूमुळे संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त केली होती.


नेतान्याहू यांच्या आभासी राष्ट्रवादामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्रायलची नाचक्की झाली. त्यांच्या कारकिर्दीत हमास या उग्रवादी संघटनेची ताकद कमी करण्यात त्यांना अपयश आले.

इस्रायल मधील जनतेला आता शांतता हवी आहे.
उजवे, डावे व मध्यममार्गी पक्ष, तसेच एक अरब पक्ष अशा वैचारिकदृष्टय़ा भिन्न राजकीय पक्षांची अभूतपूर्व आघाडी असलेल्या या नव्या सरकारकडे निसटते बहुमत आहे. यामध्ये अरब इस्लामिक पुराणमतवादी पक्षासह तीन दक्षिणपंथी, दोन सेंट्रिस्ट आणि दोन डाव्या विचारसरणीच्या पक्षांचा समावेश आहे. ६० विरुद्ध ५९ अशा केवळ एका मताने नव्या आघाडीने विजय मिळवला.

बेनेट यांनी रविवारी क्नेसेटमध्ये (इस्रायली संसद) त्यांच्या नव्या सरकारमधील मंत्र्यांचा परिचय करून दिला. नेतान्याहू यांच्या समर्थकांनी त्यांच्या भाषणात वारंवार अडथळे आणले. विरोधी पक्षांच्या सदस्यांचा अखंड गोंधळ सुरू असतानाच, बेनेट यांनी भाषणात नव्या आघाडीच्या वाटचालीची दिशा स्पष्ट केली. निरनिराळ्या मतांच्या नेत्यांसोबत आपण ही आघाडी तयार केली असून, या आघाडीबाबत आपल्याला अभिमान आहे. या निर्णायक क्षणी आम्ही जबाबदारी घेतली आहे. या देशाला आणखी विभाजित होऊ द्यायचे नाही, यासाठी असा निर्णय घ्यावा लागला, असे बेनेट म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा