Breaking

मोठी बातमी : आशा व गटप्रवर्तकांचा उद्या राज्यव्यापी एल्गार, अंगणवाडी कर्मचारीही होणार सहभागी !


पुणे, दि. २० : आशा व गटप्रवर्तकांचा राज्यव्यापी संप सुरू आहे. उद्या आशा व गटप्रवर्तक जिल्हास्तरावर आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात अंगणवाडी कर्मचारीही सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजते.


महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या आदेशानुसार 15 जून 2021 पासून संपूर्ण महाराष्ट्रात आशा व गटप्रवर्तक यांच्या न्याय मागण्यांसाठी बेमुदत संप आंदोलन सुरू आहे. या मागण्यांबाबत शासन योग्य तो निर्णय घेत नसल्याने राज्य कृती समितीच्या वतीने 21 जून 2021 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलने करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 

■ आशा व गटप्रवर्तकांच्या मागण्या पुढीलप्रमाणे : 

● सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत करा.

● आशा व गटप्रवर्तकाना आरोग्य कर्मचारी म्हणून केले पाहिजे.

● आशाना १८,००० रू. व गटप्रवर्तकाना २२,००० रू. वेतन मिळाले पाहिजे. 

● आशा व गटप्रवर्तकाना प्रतिदिन ३०० रू. कोविड भत्ता मिळाला पाहिजे. 

● आशा व गटप्रवर्तकाना माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा सर्व टप्प्याचा मोबदला मिळाला पाहिजे. 

● कोरोना बाधित आशा व गटप्रवर्तक व त्यांच्या कुटुंबियांना व्हेंटिलेटरसह बेड राखीव ठेवण्यात यावेत.

● अँटीजेनचे टेस्टचे काम आशांवर लादू नये.

● आरोग्य कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास 50 लाखाचा विमा कवच आहे, त्यामध्ये आशा व गटप्रवर्तक यांचा स्पष्ट उल्लेख करावा.

● आरोग्यवर्धिनी समूह मध्ये गटप्रवर्तकना १५०० रू. दरमहा मोबदला द्यावा.

● प्रेरणा प्रकल्प रिपोर्टिंग साठी गटप्रवर्तकना १५०० रू सहामाही भत्ता व स्टेशनरी साठी ३००० रू. वार्षिक रक्कम द्यावी.

◆ आरोग्यसेविका भरतीमध्ये आशा व गटप्रवर्तक ना 50 टक्के आरक्षण मिळावे.  

● आशांना योजनाबाह्य व मोबदला नसलेले काम देऊ नये. 

● दरमहा मोबदल्याची हिशोब पावती आशा व गटप्रवर्तकांना द्यावी. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा