Breaking
मोठी बातमी : अर्थमंत्र्यांकडून विविध पँकेजची घोषणा, पहा आरोग्य क्षेत्रासाठीची तरतूद !


नवी दिल्ली
, दि.28 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला आणि आरोग्य क्षेत्रासाठी घोषणा केली. सीतारमण म्हणाल्या, 'आजच्या 8 उपाय योजनांमध्ये 4 उपाय नवे आहेत आणि आरोग्य क्षेत्राशी संबंधित आहेत. या अंतर्गत कोविडने प्रभावित झालेल्या क्षेत्रांसाठी 1.1 लाख कोटी रुपयांची लोन गॅरंटी स्कीम सुरू करण्यात येईल. 


■ आरोग्य क्षेत्रासाठी 50 हजार कोटींंची तरतूद : 23,220 कोटी रुपये सार्वजनिक आरोग्यासाठी असणार आहेत. मुलांवर आणि बालरोगविषयक काळजीवर विशेष भर देण्यात येईल. यात वैद्यकीय विद्यार्थी, परिचारिका, एचआर वाढीचा समावेश असेल; वैद्यकीय पायाभूत सुविधा मजबूत करणे. ही रक्कम या आर्थिक वर्षातच खर्च करायची आहे.

■ इतर क्षेत्रासाठी 60 हजार कोटींं तरतूद 

■ पर्यटन क्षेत्रासाठी पॅकेज : 11 हजार नोंदणीकृत टुरीस्ट गाईड्स, ट्रॅव्हेल आणि टुरीझम स्टेकहॉल्डर्सना मदत, 100 टक्के गॅरंटीने कर्ज उपलब्ध, आंतरराष्ट्रीय प्रवास पुन्हा सुरू झाल्यावर पहिल्यांदा भारतात आलेल्या 5 लाख पर्यटकांना व्हिसा फी भरावी लागणार नाही. एका पर्यटकाला याचा एकदाच लाभ घेता येणार.

■ रोजगार : देशात रोजगार वाढवण्यासाठी 1 ऑक्टेबर 2020 ला सुरु करण्यात आलेल्या आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेची मुदत वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत 22,810 कोटी रुपयांचा 58.50 लाख लोकांना लाभ झाला आहे . 31 मार्च 2022 पर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. 

गेल्या वेळी आत्मनिर्भर रोजगार योजनेअंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या घोषणेनुसार, ज्या कंपन्यांची कर्मचारी संख्या 100 च्या आत आहे. आणि नव्याने नोकरीवर ठेवण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महिना पगार 15 हजारपर्यंत आहे, अशा कर्मचाऱ्यांचा 12 टक्के पीएफचा हिस्सा आणि अशा कंपन्यांचा 12 टक्के असा एकूण 24 टक्के पीएफचा हिस्सा हा केंद्र सरकारकडून भरला जाईल. आता या योजनेची मर्यादा पुढे वाढवत 30 जून 2021 पासून 31 मार्च 2022 पर्यंत करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा