Breaking




मोठी बातमी : राज्यातील आशा व गटप्रवर्तकांचा संप मिटला


मुंबई, दि. २३ : राज्यातील आशा वर्कर्सचा संप अखेर मिटला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पुन्हा आशा संपाबाबत कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी आशांना १ जुलै २०२१ पासून १००० रुपये निश्चित मानधन वाढ आणि ५०० रुपये कोविड भत्ता देण्याचा निर्णय झाला. आरोग्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत तोडगा निघाल्याने संप मागे घेत असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीनंतर जाहीर केले.

राज्यातील आशा ल गटप्रवर्तकांचा १५ जूनपासून बेमुदत संप चालू होता. संपानंतर तीन बैठक निष्फळ ठरल्यानंतर अखेर आज संप मागे घेण्यात आला.

ऐन कोरोना महामारीच्या काळात आशा वर्कर्सनी पुकारलेल्या या संपामुळे रुग्णांचे हाल होण्याची दाट शक्यता वर्तविली जात होती. मात्र, आता आरोग्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत तोडगा निघाल्याने संप मागे घेण्यात आला आहे.

राज्यातील ७२ हजारांहून अधिक आशा वर्कर्स बेमुदत संपावर गेल्या होत्या. दरम्यान, राज्यभरातील आशा वर्कर्सनी पुकारलेल्या संपावर तोडगा काढण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून आशा वर्कर्स संघटनेचे पदाधिकारी आणि आरोग्यमंत्र्यांमध्ये चर्चा सुरु होत्या. आशा वर्कर्सचा संप पुकारल्यापासून आशा वर्कर्स संघटनेचे पदाधिकारी आणि आरोग्यमंत्र्यांमध्ये तीन बैठका झाल्या. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा