Breakingमराठा आरक्षणासाठी मुंबईत बाईक रॅलीमुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाने नाराजी व्यक्त केली, त्यानंतर मराठा समाजाच्या विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यात आंदोलने करण्यात येत आहे.


याच पार्श्वभूमीवर मराठा समाजात जनजागृती व्हावी या उद्देशाने आज मुंबईत बाईक रॅलीचे काढण्यात येत आहे. सोमय्या मैदान ते सीएसएमटी पर्यंत ही रॅली काढण्यात आली आहे. या बाईक रॅलीमध्ये मुंबईच्या विविध भागातील आंदोलकांनी सहभाग घेतला आहे, तसेच मराठा समाजातील लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार रॅलीमध्ये मराठा आरक्षण समर्थनार्थ सहभागी होत आहेत.


दरम्यान, मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा