Breaking
ब्रेकिंग : राज्यातील बारावीच्या परीक्षा संदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णयमुंबई : देशातील कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता राज्यातील देखील बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत १२ वीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा अधिकृतपणे रद्द झाल्या आहेत.


दरम्यान, काल शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले होते की, “बारावीच्या परीक्षांसदर्भातील परिस्थिती आम्ही मंत्रिमंडळासमोर मांडली आहे. आमचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळवला आहे. त्यानंतर त्यांची परवानगी आली की आम्ही परीक्षेबाबत निर्णय जाहीर करू” असेही सांगितले होते.


अखेर महाराष्ट्र सरकारने बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा १४ लाख विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. महाराष्ट्र सरकारनं बारावीच्या परीक्षासंदर्भात केंद्राकडे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा मुद्दा मांडला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा