Breakingब्रिटन पुन्हा कोरोनाच्या विळख्यात २२ हजार नवे रुग्णब्रिटन : ब्रिटनमध्ये सुमारे पाच महिन्यांनंतर २२ हजारांहून जास्त नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. सोमवारी येथे नवे २२ हजार ८६८ रुग्ण आढळून आले आहेत. याच वर्षी ३० जानेवारीला २३ हजार १०८ नवे रुग्ण आढळले होते. ब्रिटनमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या वाढून ३,०७,७७६ एवढी झाली आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सेल्फ आयसोलेशनमुळेही सरकारच्या चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे पालक त्रस्त झाले आहेत. 


मुलांच्या शिक्षणावर देखील परिणाम होताना दिसतो. आता सरकार विद्यार्थ्यांचे सेल्फ आयसोलेशन संपवण्याची तयार करत आहे. शालेय मंत्री निक गिब मंगळवारी म्हणाले, आम्ही मुलांसाठी सेल्फ आयसोलेशन व्यतिरिक्त दैनंदिन पातळीवर कॉन्टॅक्ट टेस्टिंगवर भर देऊ इच्छितो. सरकार १९ जुलैच्या आधी याबद्दल निर्णय घेईल.


ब्रिटनमध्ये १७ जूनपर्यंत १.७० लाख विद्यार्थी सेल्फ आयसोलेशनमध्ये होते. ही मुले कोरोना झालेल्यांच्या संपर्कात आली होती. हे अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांपैकी २ टक्के एवढे प्रमाण आहे. त्यानंतर पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे सरकार व पालक दबावाखाली आले होते. मुलांचे सेल्फ आयसोलेशन आता संपवण्यात यावे, अशी पालकांची मागणी आहे. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. पालकांना नोकरी किंवा कामासाठी घराबाहेर पडणेही कठीण झाले. 


हाँगकाँगने ब्रिटनच्या विमानांना तूर्त निर्बंध लागू केले आहेत. स्पेननेदेखील ब्रिटनला निर्बंधमुक्त यादीतून हटवले. नव्या आदेशानुसार स्पेनमध्ये केवळ लसीकरण झालेले किंवा कोरोना निगेटिव्ह अहवाल असलेल्या ब्रिटिश प्रवाशांना प्रवेश दिला जाणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा