Breakingमुख्यमंत्र्यांचा आशा सेविकांशी संवाद, अधिकाऱ्यांचे आशांंना ऑनलाईन प्रश्न न मांडण्याची धमकी, संघटनेचे राजेंद्र साठे यांचा आरोप


मुख्यमंत्र्यांची व्हि शी केवळ पोकळ घोषणा - सीटूचे अध्यक्ष राजेंद्र साठे


आशा वर्करांना वरिष्ठ अधिकाऱ्यांची VC च्या आधीच फोनवर धमकी

नागपूर : आशा सेविकांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संबोधित केले. या अधिच वि शी च्या आधीच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आशा वर्कर यांना मेसेजद्वारे तसेच फोनवर धमकावण्याचे काम केले की वी सी चे आधी किंवा चालू असताना कोणीही आपल्या समस्या मांडू नये. समस्या मांडण्याच्या प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा आरोप आशा व गटप्रवर्तक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र साठे यांनी केला आहे.

साठे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी आशा वर्कर बरोबर संवाद साधण्याचां कार्यक्रम ठरवला. परंतु कार्यक्रमांमध्ये येऊ शकणाऱ्या तिसरा लाटे बाबत आशांनी नागरिकांची कशी काळजी घ्यायची यावर मार्गदर्शन केले. त्याच बरोबर उपस्थित काही वरिष्ठ डॉक्टरांनी सुद्धा मुलांवर होणाऱ्या नवीन रोगाबद्दल माहिती दिली. मोठ्या संख्येने राज्यभरातील आशा वर्कर व गटप्रवर्तक त्यांच्याबद्दल मुख्यमंत्री काही चांगली घोषणा करणार असा अंदाज बांधला. परंतु तो फोल ठरला असल्याचे साठे म्हणाले.

पुढे बोलताना साठे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी घोर निराशा केली असून आशा वर्कर व गटप्रवर्तक यांचे वर्तुळात महाराष्ट्र प्रशासनाच्या विरोधात रोष निर्माण झालेला आहे. येत्या 15 जूनपासून असलेल्या आशा व गटप्रवर्तक यांच्या संपाबाबत मुख्यमंत्री महोदय काही घोषणा करतील असे त्यांना वाटले परंतु मोदी सरकारच्या काम चलाऊ कामाप्रमाणे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांची वी शी सुद्धा फेल ठरली, असेही ते म्हणाले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा