Breaking

चांदवड : आरक्षण बचाव साठी भाजपाचे चक्काजाम आंदोलन



चांदवड (सुनील सोनवणे) : आज चांदवड येथील गणुर चौफुली येथे भाजपाच्या वतीने रास्ता रोको करून निवेदन देण्यात आले. 


चांदवड तालुक्यातील आणि खेडोपाडी असलेल्या शेतकरी व मराठमोळ्या जनतेसाठी हे राज्य सरकार जनतेची दिशाभूल करतंय. मराठा समाज व ओबीसी अजून तरी आपल्या न्याय हक्कासाठी जागे होणार आहे की नाही नाहीतर समान नागरी कायदा लागू करावा असा संतापजनक सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.


स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द का झाले यांचे कारणे दाखवा मराठा  आरक्षण टिकवता आले नाही आणि ओबीसीला देखील डंक लावला असा संताप जनक सवाल चांदवडकर यांनी यावेळी आपल्या चक्काजामच्या वेळी केला.


सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण (OBC reservation) रद्द ठरवले आहे. यासंदर्भातील ठाकरे सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालायने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे ग्रामपंचायत, जिल्हापरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना मिळणार राजकीय आरक्षण या ठाकरे सरकारला टिकवता आले नाही, अशी टिकाही करण्यात आली.


यावेळी चांदवड तसेच जिल्हा पदाधिकारी भूषण कासलीवाल, अशोक काका व्यवहारे, डॉ.आत्माराम कुंभार्डे, यांनी पोलीस निरीक्षक समीर बारावकर यांना निवेदन दिले. 


यावेळी मन्सूरभाई मुळांनी, गणेश महाले, विशाल ललवानी, सुभाष पुरकर, अंकुर कासलीवाल, किशोर क्षेत्रीय, बापू भवर, विजय धाकराव, जगदीश कोल्हे, योगेश ढोमसे, संजय पाडवी, आत्माराम खताळ, किरण बोरसे, मनोज बांगरे, निलेश काळे, मुकेश आहेर, गणेश पारवे, साईनाथ कोल्हे, प्रशांत ठाकरे, बाळासाहेब माळी, दिशांत देवरे, राहुल हाडगे, वाल्मीक वानखेडे, राजेश गांगुर्डे, योगेश बोरसे, सागर आहेर, नितीन फंगाळ आदी नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा