Breaking
चांदवड नगरपरिषदेचा अनगोंदी कारभार, प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष, शिवसेनेने दिला आंदोलनाचा इशाराचांदवड (सुनील सोनवणे) : चांदवड शहरात घंटागाड्या अजूनही वेळेवर येत नसल्याने परिसरात कचरा पसरलेला दिसतो. त्यातच डासांचे साम्राज्य सध्या चांदवड शहरात असल्याने नगरपरिषद तर्फे फवारण्या होणे गरजेचे आहे. मात्र स्वच्छता विभाग याबाबत गंभीर नसल्याचे चित्र शहरात आहे.


चांदवड शहरातील बस स्टँड शेजारील महालक्ष्मी नगर सुरुवातीस असलेली कचरा कुंडी फुल होऊन उतू जात असल्याचे चित्र आज दिसत आहे. काही दिवसांपूर्वी चांदवड बस स्टँड जवळील नाला साफसफाईला सुरुवात केल्याचे दिसले असताना ती साफसफाई मात्र आता अपूर्ण अवस्थेत सोडून दिलेली आहे. आज कचरा कुंडी उतू जात असल्याने स्वच्छता विभाग नेमके काय करतोय, असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.शहरातुन घंटागाडी गायबच आहे, एक ट्रॅक्टर फक्त नगरपरिषद तर्फे चालु आहे. बाकी गाड्या का बंद आहेत. नगरपरिषदेने ठेकेदार कंपनीला जर चालु स्थितीत गाड्या दिलेल्या होत्या तर परत घेतांना त्या कशा प्रकारे घेतल्या यातही ''दया कुछ तो गडबड है'' अशाप्रकारे जनतेतून दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली आहे.चेंबर फुटल्याने ''रस्त्यावर पाणी"


चांदवड नगरपरिषद हद्दीतील फुलेनगर भागातील रहिवासी यांनी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजित कदम यांना आज एक निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, फुलेनगर तळवाडे रोड भागात काँक्रीटकरणाचे काम सुरू असताना सामूहिक चेंबर फुटलेले आहे. या चेंबरमधील पाणी तळवाडे रस्त्यावर येत असून यामुळे जनता त्रस्त झालेली आहे. रस्त्यात खड्डे पडलेले असल्याने अपघात होतात. तसेच घाण पाण्यामुळे डेंगू आजार पसरू शकतो. चांदवड नगरपरिषदने दोन दिवसात यातून मार्ग काढावा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रशांत प्रजापत, मनोज जाधव, गुड़डु खैरनार व नागरिकांनी दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: