Breaking


चांदवड : चंद्रेश्वरगड येथे समाधी मंदिर, चंद्रेश्वरीमाता माता मंदिर जिर्णोद्धार भुमिपूजन सोहळा संपन्नचांदवड / सुनिल सोनवणे : महंत बन्सीपुरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व व्यवस्थापक स्वामी जयदेवपुरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी दयानंद महाराज (प्रथम चंद्रेश्वरबाबा), महामंडलेश्वर स्वामी विद्यानंदपुरी महाराज (द्वितीय चंद्रेश्वरबाबा) श्री चंद्रेश्वरी माता मंदिर भुमिपुजन सोहळा उत्साहात संपन्न झाला. 


यावेळी स्वामी जयदेवपुरी महाराज व भक्त परिवारातील प्रातिनिधीक स्वरूपात ज्येष्ठांच्या हस्ते भुमिपूजन करण्यात आले.


या शुभ प्रसंगी पंचक्रोशीतील भक्त मंडळी उपस्थित होते. सोहळा यशस्वीतेसाठी श्री चंद्रेश्वर सेवा भक्त परिवाराने परिश्रम घेतले. सदर कार्य हे लोकसहभागातून होत आहे, त्यामुळे मंदिर जिर्णोद्धारासाठी मदतीचे आवाहन यावेळी करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा