Breaking
चांदवड : स्वच्छ भारत अभियानाचा फज्जा, स्वच्छतेकडे नगरपरिषदेचे दुर्लक्षकचराकुंडी फुल, सर्वत्र कचराच कचरा


चांदवड / विकी गवळी : कोरोना महामारी असतानाही चांदवड नगरपरिषद क्षेत्रात स्वच्छ भारत अभियानाचा फज्जा उडाल्याचे दिसत आहे. कचरा कु़ड्या फुुल झालेल्या असून नगरपरिषद दुर्लक्ष करत असल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत.


चांदवड शहरात घंटागाड्या अजूनही वेळेवर येत नसल्याने कचरा सर्वत्र पसरलेला दिसतो. त्यामुळे डासांचे साम्राज्य सध्या चांदवड शहरात असल्याने नगरपरिषद तर्फे फवारण्या होणे गरजेचे आहे. मात्र स्वच्छता विभाग याबाबत गंभीर नसल्याचे चित्र दिसत आहे.


चांदवड शहरातील बस स्टँड शेजारील महालक्ष्मी नगर सुरुवातीस असलेली कचरा कुंडी पुर्णतः भरली आहे. काही दिवसांपूर्वी चांदवड बस स्टँड जवळील नाला साफसफाईला सुरुवात केली होती. मात्र साफसफाई पुर्ण करण्यात आलेली नाही.


यावर बोलताना चांदवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजित कदम म्हणाले, नगरपरिषदचा कार्यकाल समाप्त झाला आहे व सर्व ठेके संपुष्टात आले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कमतरता सद्या भासत असून नवीन ठेका देण्यात येई पर्यत चांदवड शहराची सर्व जबाबदारी नगरपरिषदेची असून, आम्ही सर्व अधिकारी व कर्मचारी शहराला संपूर्ण सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहोत. घंटा गाडी 1 तारखेपासून नियमित सुरू करू, असेही मुख्याधिकारीअभिजित कदम यांनी प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा