Breaking
चिंचवड : देव दर्शन युवामंच तर्फे सलग महिनाभर पोळीभाजी, नाष्ट्याचे वाटप


चिंचवड : देव दर्शन युवामंच या चिंचवड स्टेशन येथील स्वयंसेवी संस्थेने एप्रिल, मे सलग लॉकडाऊनच्या काळात गरम पोळीभाजी, स्नॅक्स ची पाकिटे वितरित केली. या संस्थेमध्ये उच्च विद्याविभूषित संवेदनशील शिक्षकांची टीम कार्यरत आहे.


संस्थापक प्रा. दीपक रामचंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी संचालिका प्रा.वैशाली गायकवाड, प्रा.मंगला सपकाळे, प्रा.दिपाली दुते, प्रा.उत्तम कदम यांच्या सह हृतिक साबळे, बळीराम राठोड या टीमने चिंचवड MIDC मधील कंत्राटी सिक्युरिटी गार्ड, हेल्पर आणि रस्त्यावरील निराश्रित, विधवा, परितक्त्या महिला, रेल्वे स्टेशन वरील बेघर गरीब आणि अपंग लोकांना वाटप करण्यात आले. 


तसेच मोहननगर, राम नगर, के एस बी चौक, इंदिरानगर, विद्यानागर, अजंठानगर, मोशी येथील निवडक आणि गरजू लोकांचा आढावा घेऊन 125  लोकांना पॅकिंग केलेले अन्न आणि नाष्ट्याचे वाटप केले.

देवदर्शन युवा मंच संस्थेने 2020 मध्येही मोठ्या प्रमाणात उपेक्षितांना मदतीचा हात दिला होता.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा