Breakingकोव्हीड आता सर्वाना परिचयाचा झालेला आहे, कोव्हीडची साखळी तोडण्यासाठी व्यक्तिगत आरोग्यासाठी संवेदनशील नागरिक बना : डॉ. किशोर खिल्लारे


पिंपरी चिंचवड कोव्हीड आता सर्वाना परिचयाचा झालेला आहे, कोव्हीडची साखळी तोडण्यासाठी व्यक्तिगत आरोग्यासाठी संवेदनशील नागरिक बना, असे उद्गार डॉ. किशोर खिल्लारे यांनी काढले.


अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या महाराष्ट्र समितीने 'कोव्हीड लाटा, आव्हाने आणि दिशा' या विषयावर ऑनलाइन अभ्यास शिबीर (दि.११ जून) आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यशवंतराव चव्हाण (YCM) वैद्यकीय महाविद्यालय, मनपा, पिंपरी चिंचवड येथे सहयोगी प्राध्यापक असलेले डॉ. किशोर खिल्लारे यांनी संपूर्ण देशातील  पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा काय परिणाम झाला याचे विश्लेषण केले.

ते म्हणाले की कोरोना सारखी महामारी शतकांनंतर जगाने प्रथमच अनुभवली आहे. लॉकडाऊन हा प्रकार भारतात प्रथमच अनुभवला गेला. युरोप मध्ये प्रथम आणि द्वितीय महायुद्धात लॉक डाऊन करण्यात आले होते. 1919 साली पाहिले महायुद्ध समाप्त झाले, परंतु स्पॅनिश फ्लू नावाची भयंकर महामारी युरोपच्या इतिहासात पसरली. त्या काळात मास्क आणि लॉकडाऊन सक्तीचे करण्यात आले होते. मेडिकल सायन्स त्याकाळात इतके विकसित नव्हते. त्यामुळे लाखो लोक स्पॅनिश फ्लू ने मेले.

कोरोना विषाणूचा प्रसार आणि त्याबद्दल जागतिक स्तरावर खूप मोठे आव्हान शास्त्रज्ञांना कोव्हीड 19 मुळे समोर उभे ठाकले. शंभर वर्षांनी नोव्हे 2019 मध्ये चीनमधून कोरोना विषाणू जगभर पसरला. महासत्तांच्या वादामुळे या महामारीपासून मानवजातीचे संरक्षण करण्यासाठी सुरुवातीला एकवाक्यता झाली नाही. अमेरिका, ब्राझील, स्पेन, इटली या देशातील भयानक वास्तव समोर आल्यावर मोठ्या प्रमाणात उपचार पद्धतीवर परिणामकारक औषधे लस कोणती असावीत यासाठी शास्त्रज्ञांनी संशोधन पूर्ण केले आहे,असेही खिल्लारे म्हणाले.

खिल्लारे म्हणाले की, या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी व्यक्तिगत पातळीवर प्रतिबंधात्मक काळजी घ्यायला हवी. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेने गंभीर अनुभव दिलेला आहे. कोरोना संसर्गजन्य आहे, या विषाणूंच्या तीन कड्या आहेत, पहिल्या कडीत तो एका व्यक्तीमध्ये संक्रमित असतो, दुसऱ्या कडीत कुटुंब आणि मानवी समूहाकडे पहिल्या रुग्णामध्ये पसरतो आणि तिसऱ्या कडीमध्ये आजूबाजूच्या पर्यावर्णमध्ये विषाणू सर्वत्र असतो. त्यामुळे सरकारचे आरोग्य खाते साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन आणि संचारबंदीचे निर्बंध जारी करते.

सर्दीसारख्या आजारामुळे हा विषाणू पसरतो, कोरडा खोकला येतो, जीभ बेचव होते, हा विषाणू अतिशय लबाड असतो, आसपास कुठे तरी याची लागण होते.
किरकोळ सर्दी पडसे, ताप आल्यावर दोनचार गोळ्या घेतल्यावर बरे वाटते. त्यामुळे मला कोरोना झालेला नाही, अशा अज्ञानात लोक असतात. मात्र अशाच वेळेला कोरोना विषाणू चार पाच दिवसांनी नाकातोंडा वाटे फुफुसात पसरतो, मग थोडासा दम लागतो, थकवा येतो इथे आपण लक्षात घेतले पाहिजे की ही वेळ गांभीर्याने तपासणी करण्याची आहे.
 
बऱ्याच वेळा किरकोळ आजार समजून सामान्य माणूस दुर्लक्ष करतो. आणि एक आठवड्यात विषाणू फुफुसात शिरलेला असतो आणि रुग्णाला कोव्हीड केअर सेंटर मध्ये ऍडमिट करावे लागते. सर्दी, पडसे, ताप असताना तपासणी केली आणि पॉझिटिव्ह असाल तर सरकार आणि मनपाच्या स्थानिक विभागाकडून तातडीने सेवा मिळते. आणि पहिल्या 12 दिवसात रुग्ण बरा होतो.

आता कोरोनाच्या लाटा म्हणजे काय? तर कोरोना बाधित रुग्ण तपासणी आधी घरात राहिला की तो घरातील लोकांना पॉझिटिव्ह करतो. आणि समूहामध्ये असे रुग्ण जातात आणि समूह संसर्ग सुरू होतो. समुद्रावर वाऱ्यामुळे जी खलबली तयार होते आणि किनाऱ्यावर वाऱ्याच्या वेगामुळे सारख्या लाटा येतात. तसेच संसर्गित माणसाचे निदान लवकर तपासणी करून घेतले नाही. माणसा माणसातुन गर्दीत गर्दीतून वस्तीत वस्तीतून शहरभर गावा गावात कोरोना वाऱ्यासारखा पसरतो. आणि हे चक्र अतिशय वेगाने पसरून आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण येतो. आरोग्य कर्मचाऱ्यासमोर हा युद्धाचा प्रसंग असतो. सर्वत्र संचार बंदी, भय, भीती असते. औषधें, इंजेक्शन, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, मनुष्यबळ याची सप्लाय चैन कोसळते.

ज्या देशांनी युद्धे अनुभवली आहेत. त्या युरोप, व्हिएतनाम, चीन, जपान इ देशातील जनतेला स्वतःच्या जीवासाठी नियम पाळण्याची परंपरागत शिस्त आहे. त्यामुळे त्या देशांनी कोरोनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटाचा यशस्वी मुकाबला केला आहे. आपणही हे आव्हान स्वीकारून कोरोनाविरोधात लढाई यशस्वी करू.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा