Breaking
पेट्रोलिंगसाठी असलेल्या पोलिसांकडून गुन्हेगाराला अटक


दोन चाकी वाहनातून चालली होती मद्य पदार्थांची वाहतूककोल्हापूर (यश रूकडीकर) :  2 जून 2021 रोजी  लक्ष्मीपुरीमधील स्वराज्य रिक्षा स्टॉप जवळ विनाकारण फिरणाऱ्या लोकांची चौकशी पोलिसांकडून चालू असताना राजेंद्र मधुकर तस्ते हा इसम आपल्या लाल रंगाच्या ॲक्टिवा मोटार सायकल वरून आला. त्यास येण्याचे कारण विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. चौकशी दरम्यान त्याच्या ॲक्टीवा गाडीची डिकी तपासली असता त्यामधे महाराष्ट्र शासनाकडून प्रतिबंधित केलेले सुमारे 3, 295 इतक्या रकमेचे तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. पोलिस उपनिरीक्षक मधुकर चौगुले यांनी राजेंद्र तस्ते याला ताब्यात घेऊन लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.

दोन चाकी वाहतूकीतून मद्याची वाहतूक चालली होती. सदरची कारवाई पोलिस निरीक्षक मधुकर मारुती चौगुले, पो.हे.कॉ जरग, अमर उबाळे यांनी केली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा