Breaking
दादाजी बागूल यांची बिरसा फायटर्स महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष पदी निवड


नाशिक : दादाजी बागूल यांची बिरसा फायटर्सच्या महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.बागलाण तालुक्यातील आदिवासी बांधवांनी दादाजी बागूल यांना राज्य कार्यकारिणीत घ्या, अशी मागणी केली म्हणून बिरसा फायटर्स च्या राज्य कार्यकारिणीत दादाजी बागूल यांची निवड करण्यात आली आहे. सुशिलकुमार पावरा संस्थापक अध्यक्ष बिरसा फायटर्स यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 24 जून 2021 रोजी बिरसा फायटर्स महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी विस्तार व विदर्भ-पुणे विभागातील नवीन शाखा पदग्रहण सोहळासाठी झूम सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत दादाजी बागूल यांची महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष पदी निवड केल्याची  घोषणा सुशिलकुमार पावरा संस्थापक अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी केली.


आदिवासी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी आपण काम करूया. नाशिक जिल्ह्यातील समस्या कडे मी विशेष लक्ष देणार आहे. माझ्या वर दिलेली जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडीन. बिरसा फायटर्स संघटनेच्या गाव तिथे शाखा होतील. लवकरच महाराष्ट्र भर बिरसा फायटर्स नावारूपाला येईल, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष दादाजी बागूल  यांनी व्यक्त केली.   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा