Breaking


दिल्लीमध्ये स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी होतेय सुरू, आमचे खूप मोठे स्वप्न पूर्ण होत असल्याची मुख्यमंत्री केजरीवाल यांची भावनानवी दिल्ली : दिल्लीमध्ये लवकरच स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी सुरू होत असून या युनिव्हर्सिटीच्या कर्णम मल्लेश्वरी या पहिल्या कुलपती असणार आहे, अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.


अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून म्हटले आहे की, दिल्ली स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी लवकरच सुरू होत आहे, आमचे खूप मोठे स्वप्न पूर्ण झाले आहे. मला हे सांगताना खूप आनंद होत आहे की, ऑलॉम्पिक पदक विजेता कर्णम मल्लेश्वरी या पहिल्या कुलपति असतील. आज त्यांच्याशी भेट झाली आणि सविस्तर चर्चा करण्यात आली.  


"कोण आहेत कर्णम मल्लेश्वरी"


कर्णम मल्लेश्वरी यांनी सिडनी ऑलिम्पिकमध्ये वजन उचलून कांस्यपदक जिंकले होते, त्यांचा विक्रम अद्याप कोणीही मोडू शकले नाही. मल्लेश्वरी यांना १९९४ मध्ये अर्जुन पुरस्कार आणि १९९९ मध्ये राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच, १९९९ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. मल्लेश्वरी सध्या एफसीआयमध्ये चीफ जनरल मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा