Breaking
शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदावर आमदार डॉ. किरण लहामटे यांनी निवड करण्याची मागणी


शिर्डी, दि. २० : शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदावर आमदार डॉ. किरण लहामटे यांची निवड करा, अशी मागणी.राष्ट्रवादी पदवीधर संघाचे तालुकाध्यक्ष सुशिलकुमार चिखले यांनी केली आहे.


शिर्डी साईबाबा देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या निवडी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठने महाराष्ट्र सरकारला आताच दिलेले आहे. त्यामुळे आता ही निवड प्रक्रिया होणार हे निश्चित झाले आहे. शिर्डी ही साईबाबांची कर्मभुमी आहे. साईबाबांचे भक्त जगाच्या कानाकोऱ्यात पसरलेले आहे. त्यामुळे विश्वस्त मंडळाची निवड महत्वपूर्ण आहे. 

न्यायालयाच्या आदेशामुळे आता विश्वस्त मंडळ निवडीच्या हालचालींना वेग आलेला आहे. साई संस्थानचा कारभार करण्यासाठी अतिशय निष्कलंक, अभ्यासु, हुशार, प्रशासकीय कामाचा अनुभव, असलेल्या व्यक्तीची निवड होणे अपेक्षित आहे. 

देशातील दोन नंबर श्रीमंत देवस्थान म्हणून साईबाबा संस्थानच नाव आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमदार डॉ  किरण लहामटे यांची निवड व्हावी अशी भावना नागरिकांतून तसेच जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे .तसेच ही मागणी राष्ट्रवादी पदवीधर संघाचे तालुका अध्यक्ष चिखले यांनीही केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा