Breaking


CITU संलग्न आशा व गट प्रवर्तक फेडरेशनच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलननांदेड, दि. 17 :  दिनांक 15 जून पासून आशा व गट प्रवर्तकांचा राज्यव्यापी बेमुद्दत संप सुरू असून नांदेड जिल्ह्यात व शहरात शंभर टक्के प्रतिसाद मिळत आहे.


त्या संपाच्या अनुषंगाने दिनांक 17 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर चार तास ठिय्या मांडून धरणे आंदोलन करण्यात आले आहे. 


राज्यातील सुमारे 70 हजार आशा कर्मचारी व गटप्रवर्तक बेमुदत संपावर आहेत. आशा कर्मचारी व गटप्रवर्तक यांना सरकारी कर्मचार्‍यांचा दर्जा द्यावा, तोपर्यंत18 हजार रुपये किमान वेतन आशांना दरमहा 18, 000रुपये, गटप्रवर्तकांना दरमहा 22, 000 रुपये याप्रमाणे किमान वेतन मिळावे व कोविड महामारीत केलेल्या कामासाठी प्रोत्साहन भत्ता शहरी व ग्रामीण भागातील आशा आणि गटप्रवर्तक यांना मिळावा, निश्चित मानधनात या काळात कपात करण्यात आली आहे ती परत द्यावी, सर्व मोबदल्याच्या थकीत रकमा तातडीने अदा करण्यात याव्यात, आशा कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवेत भरती करताना प्राधान्य देण्यात यावे या मागण्यांसाठी हा संप आहे .


आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्षा उज्वला पडलवार यांनी केले तर आंदोलन यशस्वी करण्यासाठी गंगाधर गायकवाड, द्रोपदा पाटील, रेखा धुतडे, शरयू कुलकर्णी आदींनी प्रयत्न केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा