Breaking

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आशा कर्मचाऱ्यांची निदर्शनेठाणे, दि. २१ : ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सीटू प्रणित आशा कर्मचारी युनियनच्या वतीने आज ठाणे जिल्ह्यातील सुमारे 100 आशा कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी निदर्शने केली. 


राज्यभरात सुमारे 70,000 आशा कर्मचारी सरकारी सेवेत कायम करावे, किमान वेतन मिळावे, कोविड काळात भत्ता, सुरक्षा साधने, विमा संरक्षण, मोफत आरोग्यसेवा मिळावी या मागण्यांसाठी 15 जून पासून राज्यात बेमुदत संपावर गेल्या आहेत. मात्र सरकारने अजूनही त्यांची योग्य दखल घेतलेली नाही.आजच्या ठाण्यातील निदर्शनांची जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी त्वरित दखल घेत शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले. कोविड काळात मनपांनी कबूल केलेला भत्ता, मृत आशांना विमा रक्कम तसेच जिल्ह्यातील सर्व आशांना सुरक्षा उपकरणे पुरवण्याचे तसेच राज्यस्तरीय मागण्यांची शिफारस पुढे पाठवण्याचे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले.


शिष्टमंडळात सीटू आशा कर्मचारी संघटनेच्या वतीने प्राची हातिवलेकर,  सुनील चव्हाण, दत्तू खराड, संगीता प्रजापती, रुद्रा ठोंबरे, विद्या चव्हाण, सोनू खंदारे, अपेक्षा जाधव, गीता माने यांचा समावेश होता.


किमान वेतन मिळेपर्यंत आपला संप चालूच ठेवण्याचा निर्धार यावेळी जिल्ह्यातील सर्व आशांनी केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा