Breakingरायगडावरील आकर्षक विद्युत रोषणाई पहिलीत का?


रायगड : ६ जून रोजी संपन्न झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याकरिता दुर्गराज रायगडावर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या माध्यमातून व डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या सौजन्याने विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्याचबरोबर २३ जून रोजी तिथीनुसार संपन्न झालेल्या शिवराजाभिषेक दिनोत्सवासाठी देखील अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या माध्यमातून विद्युत रोषणाई करण्यात आली होती. राजसदर, नगारखाना, शिरकाई मंदिर बालेकिल्ल्याचा परिसर व जगदीश्वर मंदिर या वास्तू आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता. 


दरम्यान, रायगड विकास प्राधिकरणाच्या वतीने अशाप्रकारची विद्युत रोषणाई कायमस्वरूपी गडावर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे, खासदार संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा