Breakingसोलापूर विद्यापीठाच्या सर्व विद्यार्थ्यांचे सरसकट परीक्षा शुल्क माफ करा; SFI चे उच्च शिक्षण मंत्र्यांना 'ई - मेल भेजो आंदोलन'


सोलापूर : सोलापूर विद्यापीठाच्या सर्व विद्यार्थ्यांचे सरसकट परीक्षा शुल्क माफ करावे, या मागणीला घेऊन स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) सोलापुर जिल्हा समिती च्या वतीने उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांना ई-मेल द्वारे सोलापुरातील कार्यकर्ते आणि शेकडो विद्यार्थ्यांनी निवेदन पाठवले आहेत.


निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण जगभरात कोविड-19 या साथीच्या रोगाने धुमाकूळ घातला आहे. या रोगामुळे आपल्या देशातील सर्वसामान्य जनतेच्या संपूर्ण जीवनावरच विपरीत परिणाम झाला आहे. असाच परिणाम आपल्या राज्यातील विद्यापीठात व संलग्न महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांवर झाला आहे. कोविड मुळे संपूर्ण राज्याचा व जिल्ह्याचा अर्थव्यवस्था कोलमडली आहे.

गरिबांचे जगणे अवघड झाले आहे. असे असतानाही राज्यातील विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क मागत आहेत. सध्याच्या काळात अनेक पालकांचे रोजगार, व्यवसाय बंद पडले आहेत. विद्यार्थि आणि पालक चिंताग्रस्त आणि तणावग्रस्त आहेत.

अशा कठीण काळात आपल्या असंवेदशीलतेचे प्रदर्शन विद्यापीठ प्रशासनाकडून होत आहे. मात्र या ही सत्रामधील फी पुर्णपणे माफ करून आपल्या संवेदनशीलतेचे उदाहरण राज्यासमोर करुन द्यावे. म्हणून आम्ही आपल्याला या निवेदनाद्वारे मागणी करत आहोत, असे म्हटले आहे.

सर्व विद्यार्थ्यांचे सरसकट परीक्षा शुल्क माफ करावे. राज्यातील सर्व विद्यापीठाचे परीक्षा शुल्क टेक्चर एकच करावे, अशी मागणी एसएफआय संघटनेने केली असल्याची माहिती जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी, जिल्हाध्यक्ष राहुल जाधव यांनी दिली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा