Breaking


मोठी बातमी : उद्या शेतकऱ्यांचा देशव्यापी एल्गार; 'शेती वाचवा, लोकशाही वाचवा' चा नारा. पहा काय आहेत मागण्या !मुंबई : उद्या देशातील शेतकऱ्यांनी देशव्यापी एल्गार पुकारला आहे. केंद्र सरकारच्या शेती कायद्याच्या विरोधात देशातील लाखो शेतकरी दिल्लीच्या सिमांवर तळ ठोकून बसले आहेत. परंतु सरकार शेतकरी प्रश्नांवर विचार करताना दिसत नाही. सरकारने पुर्णतः या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले आहे. सरकारचे आणि देशातील कोट्यवधी जनतेचे लक्ष वेधण्यासाठी उद्या संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने देशव्यापी एल्गार पुकारला आहे. उद्या देशभरातून राष्ट्रपतींंना निवेदन पाठविण्यात येणार आहे.


संयुक्त किसान मोर्चामध्ये देशभरातील ५०० पेक्षा जास्त शेतकरी संघटना सहभागी आहेत. या संयुक्त किसान मोर्चाने 'शेती वाचवा, लोकशाही वाचवा' ही घोषणा केली आहे.


उद्या देशभरातील प्रत्येक राज्यातील राजभवनासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असून जिल्हा, तालुका, गाव या ठिकाणी आंदोलन, धरणे, निदर्शने करण्यात येणार आहेत.


शेतकरी कायदे मागे घ्या, सुधारित विज बिल विधयेक मागे घ्या, शेतीमालाला हमीभाव देणार कायदा करा, विचारवंत, लेखक, मानवाधिकार कार्यकर्ते यांच्यावरील गुन्हे मागे घ्या या प्रमुख मागण्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात येणार असून देशभरातून राष्ट्रपतींंना निवेदन पाठविण्यात येणार आहे.


देशभरातील शेतकरी गेल्या सात महिन्यापासून दिल्लीच्या सिमेवर बसले आहेत. या आंदोलनात ५०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता तरी देशाच्या राष्ट्रपतींंना शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्यासाठी हे लक्षवेधी आंदोलन करण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा