Breaking


शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना 'इडी'कडून अटक, ५१२ कोटी रुपयांच्या संशयित अपहार प्रकरण. वाचा सविस्तरकर्नाळा बँक घोटाळ्यात मनी लाँडरिंगप्रकरणी राहत्या घरून घेतलं ताब्यात


रायगड : रायगड जिल्ह्यातील कर्नाळा बँकेत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला असून बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार विवेक पाटील यांना अटक करण्यात आली आहे. विवेक पाटील यांना त्यांच्या पनवेल येथील घरातून ताब्यात घेतलं आहे. या गैरव्यवहारात मनी लाँडरिंग झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. 


पनवेलमध्ये या गैरव्यवहारात विरोधात काही महिन्यांपूर्वी मोर्चे काढण्यात आले होते. विवेक पाटील यांच्या धोरणांमुळे ठेवीदार संकटात सापडले असल्याची ओरड या मोच्यातून दिसून आली. या कारवाई दरम्यान विवेक पाटील यांच्या घराचीही झाडाझडती ईडीने घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील कर्नाळा नागरी सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने माजी आमदार विवेक पाटील यांना पनवेल येथून मंगळवारी रात्री अटक केली. या प्रकरणातील 512 कोटी रुपयांच्या संशयित मनी लाँडरिंग प्रकरणी त्यांना अटक करण्यात आले असून त्यांना बुधवारी न्यायालयापुढे हजर करण्यात येणार असल्याची माहिती 'ईडी'च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 


कर्नाळा नागरी सहकारी बँक गैरव्यवहाराप्रकरणी रायगड जिल्हा विशेष लेखापरीक्षकांनी बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह संचालक, अधिकारी अशा 76 जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्याआधारे याआधीच सर्वांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. या गुन्ह्याला आधार बनवून ईडीने याप्रकरणी झालेल्या संशयीत मनी लाँडरींगचा तपास सुरू केला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा