Breakingचार घास सुखाचे : गोर गरीबाच्या हृदयात ईश्वर असतो - सचिन साठे


कामगार नेत्याची आर्थिक मदत


पिंपरी चिंचवड : भारत देशाला महामारीने ग्रासले आहे. या अभूतपूर्व कालखंडात रोजंदारी आणि स्थलांतरित कामगारांचे हाल होत आहेत. पिंपरी चिंचवड मध्ये श्रमिकांच्या जगात काम करणारे अनेक कार्यकर्ते दिवस रात्र गरिबांच्या अडचणी सोडवण्याचे काम करत आहेत. 

गोरगरीब घरेलू कामगार, स्थलांतरित यांना दररोज "चार घास सुखाचे" देऊन अन्नदानाचा #काशिनाथ नखाते' यांचा उपक्रम हे मोठे पुण्य कार्य आहे. कारण ईश्वर गोरगरिबांच्या ह्रदयात असतो, असे मत भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस (आय) चे अध्यक्ष सचिन साठे यांनी थेरमॅक्स चौक चिंचवड येथील अन्नदान कार्यक्रमात व्यक्त केले.


कामगार नेते विष्णू नेवाळे म्हणाले की, कोरोना संकटामुळे या औद्योगिक शहरातील अर्थकारणावर आणि उद्योगधंद्यावर विपरीत परिणाम झालेले आहेत. श्रमिकांची उपासमार होऊ नये, यासाठी कष्टकरी महासंघाचे कार्य सर्वाना मार्ग दाखवणारे आहे. आम्ही तुमच्या कार्याला अन्नधान्य आणि आर्थिक मदत मिळवून देऊ. "चार घास सुखाचे" ही अभिनव चळवळ आहे. आणि इथे गरिबांना घास भरवताना परमानंद मिळाला आहे. मी या कार्यासाठी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत देत आहे. गेले दोन महिने हा उपक्रम सुरू आहे. संघटनेच्या दहा रिक्षा दररोज जेवण घेऊन गरजू लोकांच्या घरी जात आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा