Breakingशेतकऱ्यांच्या हितासाठी बकरी ईद निमित्त बोकड मंडईस परवागनी द्यावी - शाहरुख मुलाणीमुख्यमंत्री व अल्पसंख्याक विकास मंत्र्यांकडे मागणी


मुंबई, दि. २७ : बकरी ईद निमित्त शेतकऱ्यांच्या हितासाठी बोकड मंडईस परवागनी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य मुल्ला मुलाणी समाजाचे संस्थापकीय अध्यक्ष तथा ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्ग. मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्याकडे ईमेल द्वारे निवेदन पाठवून केली आहे.


यावेळी मुलाणी म्हणाले की, कोरोना मुळे मुलाणी समाज व खाटीक समाजाची दैनीय अवस्था झाली आहे. बोकड कापून कसबस हा समाज आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करत असतो. पण, गेल्या २ वर्षांपासून कोरोना कोविड - १९ च्या विषाणूच्या संसर्गजन्य आजारामुळे शासनाने जनहितार्थ जाहीर केलेल्या  लॉकडाऊन मुळे या समाजाचे जगणे मुश्कील झाले आहे. त्यात देवीदेवतांचे जत्रा व दर्गा चे उरूस बंद असल्याने तसेच जनावरांचे बाजार बंद असल्याने, त्याचबरोबर मटणाच्या दुकानावर देखील असलेले वेळेचे निर्बंध यामुळे व्यवसायावर परिणाम झालेला आहे. बकरी ईद निमित्त स्थानिक नागरिकांना लांब जाऊन बोकड खरेदी करण्यापेक्षा शहरात बोकड उपलब्ध व्हावे या अनुषंगाने ही विविध शहरात बोकड मंडई भरविण्यात येते. यावेळी या मंडईत मध्ये विविध राज्यातून व्यापारी येत असता त्यात बहुतांश हे शेतकरी असतात. सह कुटुंब शेतकरी वर्षभर शेळीपालन करत असतात. हे व्यापारी गुजरात, राजस्थान मधून आलेले असतात. शेळीपालन करणारे हे शेतकरी वर्षभरात आवश्यक तेव्हाच बोकड विकतात. पण अधिकतर बोकड हे केवळ बकरी ईद साठी राखून ठेवतात. जेणेकरून अधिक नफा व्हावा. चार पैसे जास्त देऊन बोकूड खरेदी करण्याची मुस्लिम भाविकांची तयारी असते. धार्मिक भावना तीव्र असल्यामुळे असे भाविक लोक पैसे देण्यासाठी बिलकूल मागे-पुढे पहात नाहीत. ती शेतकऱ्यांसाठी पर्वणीच बाजू असते. यातूनच बकरी ईद ला मुंबईत येऊन हे बोकड विकतात. आलेल्या पैशातून कुटुंबातील मुलींची लग्ने, मुलांचे शिक्षण आदी संसार करत असतात. तसेच मुलाणी समाज व खाटिक समाजाच्या संघटनेस झालेल्या नफ्यातून इतर कुटुंबाप्रमाणे गोरगरीब, अनाथ, विधवा महिनांना ईद साजरी करता यावी म्हणून त्यांना मदत कार्य केले जाते.


ज्याअर्थी कोरोना कोविड - १९ विषाणू चा प्रसार होत आहे त्याअर्थी मुसलमान समुदाय शासनास पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे व कायम राहील. परंतु, ज्या व्यक्तीस बोकडाचे खरेदी पैसे दान करायचे आहे. ते करतीलच. पण, ज्यांना बोकड घेऊनच सण साजरा करावयाचा असेल व शेतकऱ्यांचा नफा व्हावा, असे सरकारला वाटत असले तर बकरी ईद निमित्त बोकड मंडईस परवानगी देणे आवश्यक आहे. त्यानुसार मुलाणी समाज व खाटिक समाज शासनाने जारी केले कोरोना चे सर्व नियमावली चे पालन करू करेल अशी ग्वाही आम्ही देतो. सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टीने हे बोकड मंडई भरेल व मास्क, हॅडग्लोव्हज, हँड सॅनिटायझेशनची बॉटल, शरीरातील तापमान तपासणी आदी सर्व काळजी घेण्यात येईल असेही आम्ही आश्वस्त करतो. असे  मुलाणी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. त्या अनुषंगाने या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून दि. २१ जुलै २०२१ येत आलेल्या बकरी ईद निमित्त कोरोना नियमांचे पालन करून बोकड मंडईस परवागनी देण्याबाबतच्या संबंधित विभागास आदेश द्यावेत, अशी मागणी  मुलाणी यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा