Breaking


नवीन पीक कर्ज मागणी धारक शेतकऱ्यांना गोेजेगाव बँकेची आडमुठी भूमिका


तात्काळ कर्ज मंजूर करा अन्यथा आमरण उपोषण करणार - पवन जगडमवार


मुखेड (नांदेड) : मागील आठ महिन्यांपासून नवीन पीक कर्जाच्या फाईल शेतकऱ्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया ( एसबीआय ) शाखा गोजेगाव ता.मुखेड जि. नांदेड या ठिकाणी दाखल केलेल्या असून बँकेचे शाखाधिकारी हे वेळोवेळी वेगवेगळे कारण सांगून अक्षरशः शेतकऱ्यांना बँकेचे खेटे मारण्यास भाग पाडत आहेत. त्यामुळे नांदेडचे जिल्हाधिकारी डाॅ.विपीन इटनकर हे शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे लक्ष देतील का ?

शाखाधिकारी यांच्या म्हणण्यानुसार 'विहीत नमुन्यातील अर्ज भरा, तीन बाँड पेपर लावा, फेरफार नक्कल लावा, टोच नकाशा लावा, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, दोन फोटो लावा' या सगळ्या अटी शर्ती पूर्ण करून सुद्धा गोजेगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडियांने नवीन पीक कर्ज मागणी धारक शेतकऱ्यांना अध्याप कर्ज मंजूर केले नाही. त्यामुळे गोजेगाव बँके अतर्गंत येणाऱ्या अनेक गावातील शेतकऱ्यांचे पीक कर्जाचे प्रस्ताव प्रलंबित असल्याने येथील शेतकऱ्यांना दरोज बँकेच्या खेटे मारावे लागत आहे.

गोजेगाव बँकेच्या शाखाधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, नवीन पीक कर्ज मागणी धारक शेतकऱ्यांना ताक्ताळ कर्ज वाटप करावे अन्यथा सर्व पीक कर्ज मागणी धारक शेतकऱ्यांना घेऊन गोजेगावच्या स्टेट बँक ऑफ इंडिया समोर आमरण उपोषण करण्यात येईल.

- पवन जगडमवार, शेतकरी पुत्र

बँकेचे कर्मचारी हे लाॅकडाऊन संपल्यावरच कर्ज मंजूर करू, सद्या कर्ज वाटप बंद आहे. कर्ज वाटप होण्यास आजून थोडे दिवस लागेल,मुख्य प्रंबधक कार्यालय बदले आहे, कर्जाचे फाईल आम्ही कुठे पाठवावे अजून सांगितले नाही. प्रंबधक कार्यालय उदगिर येथे गेले आहे. तेथे अजून स्टाॅफ भेटले नाही, असे कारण सांगत. तारीख पे तारीख देऊन, टोलवाटोलवीचे उत्तरे देत. गेल्या आठ ते नऊ महिन्यापांसून नवीन पीक मागणी धारक शेतकऱ्यांना गोजेगाव बँकेचे शाखाधिकारी हे बँके भोवती  फिरवत आहेत. त्यामुळे एखाद्या शेतकऱ्यांने पिक कर्जासाठी आत्महत्या केल्यावरच बँक प्रशासनाला जाग येईल का असा प्रश्न आता पडलेला आहे.

खरीप हंगामा गेला, रब्बी हंगामा गेला आत्ता जून महिना आला तरी शेतकऱ्यांना पीक कर्ज का मिळेना, गेल्या वर्षी अतिवृष्टी व पूरसदृष्य परिस्थिती मुळे शेतकऱ्याच्या हातात काहीच आले नाही. त्यामुळे अक्षरशा शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आलेली असताना सुद्धा गोजेगाव बँकेचे शाखाधिकारी यांनी नवीन पिक कर्ज मागणी धारक शेतकऱ्यांना केराची टोपली दाखवून, शेतकऱ्याच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. कारण जून महिना आला आहे. ऐन पेरणीच्या तोडांवर शेतकऱ्याच्या तोंडाला पान पुसण्याच काम बँक करत आहे. पेरणीसाठी आवश्यक असणारे खत बी बियाणे घेण्यासाठी पैसे नसल्याने येथील शेतकरी आत्महत्या करतील. त्यामुळे नांदेडचे जिल्हाधिकारी डाॅ विपीन इटनकर यांनी गोजेगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडिया च्या शाखाधिकाऱ्यांना आदेश देऊन तात्काळ येथील शेकऱ्यांना पिक कर्ज मिळवून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांंकडून होत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा