Breakingआशा व गटप्रवर्तकांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे


मुंबई, दि. ७ जूूून : आशा व गटप्रवर्तकांच्या मागण्यांबाबत सरकार सरकारात्मक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले. ते "मुलांमधील कोविड संसर्ग आणि आशा सेविकांची जबाबदारी" यावर बाल रोग तज्ञ टास्क फोर्सचा आशा सेविकांशी संवाद या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.ठाकरे म्हणाले, आशा ताईंचे मनापासून धन्यवाद ! कोरोनाचे संकट टळलेले नाही. परंतु ते टाळण्यासाठी यंत्रणा तयार आहे. आशांंच्या व्यथा आणि वेदना सरकारच्या विचारधीन आहेत. आशांंचे ऋण कधीही विसरणार नाही, त्याची परतफेड करता येणार नाही. आशांंच्या मागण्यांवर मार्ग काढण्यासाठी थोडासा अवधी देण्याची विनंतीही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आशांकडे केली आहे. 

तसेच आशा व अंगणवाडी सेविका या व्यवस्थेचा कणा आहेत. तिसरी लाट थोपविण्यासाठी तुमच्या मदतीची गरज असल्याचेही ठाकरे म्हणाले. 

सध्या राज्यात ६८ हजार आशा कार्यरत आहेत. कोरोना काळातील काम निश्चितच उल्लेखनीय आहे. ते आरोग्य व्यवस्थेचा का आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा