Breakingशिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून बहुजन समाजाकडून छत्रपती शिवरायांना अभिवादन

 


 

कोल्हापूर (यश रुकडीकर) : शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील बहुजन समाजातील पदाधिकाऱ्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


त्यावेळी एम.आय.एम पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव प्रा. शाहिद शेख म्हणाले की, न्यायाचे व समतेचे राज्य स्थापन करणाऱ्या जाणता राजा छ.शिवाजी महाराजांचे विचार आजच्या काळात तरूण पिढीला समजावून सांगितले पाहिजे, तर डी.पी.आय शहर अध्यक्ष प्रवीण वाघमारे यांनी इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.


यावेळी एम.आय.एम पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव प्रा.शाहिद शेख, शहर युवा अध्यक्ष सुहेल शेख, इलियास कुन्नरे, शहर कार्याध्यक्ष अय्याज मुजावर, डी.पी.आय शहर अध्यक्ष प्रवीण वाघमारे, पुरोगामी दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष सतीश कांबळे, रिपब्लिकन पक्षाचे चिमाजी अप्पा सोरटे, जावेद शेख, फहीम वस्ता, विशाल कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा