Breaking...त्याचा फटका पेशवाईला बसेल, शिवशाहीला नाही, नाना पटोले यांची टीकाअमरावती : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सध्या खासदार संभाजीराजे हे चांगलेच आक्रमक झालेले दिसत आहेत. दरम्यान त्यांनी महाराष्ट्र दौरा करून राज्यातील विविध क्षेत्रातील व्यक्तींची भेट घेतली होती. त्यावेळी संभाजीराजे यांनी वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची देखील भेट घेतली होती त्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यावरून आता पुन्हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली आहे.


सध्या नाना पटोले हे कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत त्यावेळी अमरावती मध्ये बोलत असताना त्यांनी पटोले म्हणाले की, येत्या निवडणुकीत वंचित आघाडी आणि संभाजीराजे छत्रपती एकत्र आल्यास त्याचा फटका पेशवाईला बसेल, शिवशाहीला नाही, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा