Breaking


आधुनिक जगातील मानव आज दिसतो तसा अतिप्राचीन काळात नव्हता - सुधीर दहीटनकरपुणे : विश्वाची निर्मिती एका आद्य अणूपासून, एका महास्फोटातून झाली आहे. या आद्य अणूची घनता आणि तापमान अतिप्रचंड होते. सुर्यमालेतील पृथ्वीचा जन्म 400 कोटी वर्षांपूर्वी झाला आहे. विश्वाचे संपूर्ण अंतरंग सतत बदलत असते. पृथ्वी थंड झाली, पाणी निर्माण होऊन त्यामध्ये एकपेशीय अमिबा तयार झाले. पाच कोटी वर्षांपूर्वी आज जगात दिसणाऱ्या सस्तन प्राण्यांचे  सुरू झाले. हय़ाच नवजीवयुगात सुमारे सव्वाकोटी वर्षांपूर्वी, मानवाचा पूर्वज असलेला बिनशेपटीचा, चतुष्पाद असलेला, पण दोन पायांवर चालण्याचा प्रयत्न करू लागलेला ‘मानव-पूर्वज माकड पृथ्वीवर वावरत होतास असे प्रतिपादन सुधीर दहीटनकर यांनी केले.


डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (डी वाय एफ आय) पिंपरी चिंचवड समितीने (दि.20 जून) आकुर्डी येथे आयोजित केलेल्या 'मानवाची कहाणी' या विषयावरील चर्चासत्रात पुणे येथे डॉ. सुधीर दहीटनकर कार्यकर्त्यासमोर बोलत होते.


ते पुढे म्हणाले की, आधुनिक जगातील मानव आज दिसतो तसा अतिप्राचीन  काळात नव्हता. आज अध्यात्मिक विचाराने पृथ्वी आणि मनुष्य निर्मिती दैवी शक्तीमुळे झाली असा एक प्रवाह आहे. मात्र वैज्ञानिक विचारसरणीतून मानवाची आणि पृथ्वीची निर्मिती ही आकाशगंगेतील महास्फोटापासून झालेली आहे. ही भौतिक शास्त्राशी संबंधित प्रक्रिया आहे. हे सप्रमाण सिद्ध झाले आहे.


माकडापासून माणूस उत्क्रांत होत गेला. कालगणने पूर्वी कितीतरी सुमारे दोन लाख वर्षे आधी माकड फक्त चार बोटाने झाडाच्या फांद्या पकडत होता. हाताचा अंगठा वेगळा झाल्या नंतर श्रम करणारा खरा माणूस निर्माण झाला.


त्यामुळे माणसाचे कूळ कोणते, त्याचे मूळ कोणते याबद्दलच्या दैवी कल्पना फ़क्त आनंद देणाऱ्या आहेत. वास्तव हे वेगळे असल्यामुळे शुद्ध रक्ताचे शुद्ध वंशाचे आम्ही ही संकल्पना विज्ञानाने खोटी ठरवली आहे. पायांवर चालणारा आदिमानव निर्माण झाला. हाच आपला पूर्वज आहे. हा आफ्रिकेतून खाण्याच्या शोधात निघाला आणि त्यानंतर माणसात हळूहळू सुधारणा होत गेली. मग या नरमानवाचे वास्तव्य काही हजारो वर्षांएवढेच आहे. परंतु इतिहासात नोंद असणारी मानवी संस्कृती पाच ते दहा हजार वर्षांत उदयास आली, तर तीनशे चारशे वर्षांत विज्ञानाची जोड देणारी मानवाची आगळीच संस्कृती निर्माण झाली.


कृषी संस्कृती मध्ये मोठ्या प्रमाणात जमीन ताब्यात घेण्यासाठी या मानवी समूहामध्ये लढाया झाल्या. गण नायक राज्य तयार झाली. हळू हळू माणसाने माणसाचे शोषण करायला सुरुवात केली. गुलामगिरी, सरंजामशाही अशा सर्व अवस्थामध्ये मानवाच्या  श्रमाचा पूर्ण उपयोग करून एका बाजूला धन संचय करणारा आणि संपूर्ण साधन संपत्तीचा मालकी हक्क सांगणारा वर्ग आणि इतर शोषित श्रमिकांचा मानव समाज उदयास आला.


फरक एव्हढच आहे की, 200 वर्षांपूर्वी असलेली उत्पादन व्यवस्था बदलत गेली. परंतु संपूर्ण समृद्ध शोषण मुक्त मानवी संस्कृती अजूनही उदयास आली नाही. भारतातील आजची परिस्थिती पाहता आपण जागतिक पातळीवर गरिबी आणि निरक्षरतेत विश्वगुरु आहोत. जगातील सर्वात मोठी भारतातील लोकसंख्या रेशनच्या रांगेत आहे. खऱ्या अर्थाने विश्वगुरु होण्यासारखी भारतातील मानवाची कहाणी नाही. त्यामुळे युवक कार्यकर्त्यानी उघड्या डोळ्याने विज्ञानाच्या आधारावर सभोवताली पाहावे. आणि वैचारिक पातळी समृद्ध करून सामाजिक समतेचे कार्य करावे, असे डॉ.सुधीर दहीटनकर यांनी सांगितले.


या विशेष अभ्यास शिबिराचे सूत्र संचालन सचिन देसाई यांनी केले. या कार्यक्रमाचे संयोजन अमिन शेख, स्वप्निल जेवळे, अमोल जगताप, शिवराज अवलोळ, देवीदास जाधव, अंजली पुजारे, पावसु कऱ्हे, शेहनाज शेख यांनी केले.

1 टिप्पणी:

  1. खूप छान माहिती दिली, मानवाची कहाणी म्हणजे त्याचा विकास आणि त्यासह जोडून येणारा समाज व निसर्गाचा विकास. वक्त्यांनी या सह त्याच्या आशयतून येणारा सुज्ञ आकलन अधोरेखित केला आहे हे पण उत्तम आहे.

    उत्तर द्याहटवा