Breaking
धारूर तहसिल कार्यालयावर संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने निर्देशनेधारूर : 'शेती वाचवा, लोकशाही वाचवा' शेतकरी विरोधी कायदे रद्द करा या मागणीसाठी संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने धारूर तहसील कार्यालयावर आज (२६ जून) निर्देशने करण्यात आली. यावेळी धारूर तहसीलदारांमार्फत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन पाठविण्यात आले.


दिल्ली येथील सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन चालू असून आज २६ जून रोजी त्या आंदोलनास सात महिने पूर्ण झाले आहेत. त्या अनुषंगाने केंद्र सरकारने आपले अडमूठे धोरण सोडून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात व राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा अशी मागणी संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने करण्यात आली.


यावेळी किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष कॉ मोहन लांब, सीटू संघटनेचे जिल्हा सचिव डॉ अशोक थोरात, यांच्यासह कॉ काशिराम सिरसट, कॉ मिरा शिंदे, वैशाली आरसुळ, लता खेपकर, मधुकर चव्हान आदींसह अनेक कार्यकर्ते हजर होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा