BreakingJOB : आठवी ते ग्रॅज्युएटपर्यंतच्या उमेदवारांना सुवर्ण संधी, BECIL मध्ये होणार विविध पदासाठी भरती


नवी दिल्ली : आठवी ते ग्रॅज्युएटपर्यंत शिक्षण झालेल्या बेरोजगारांसाठी एक मोठी खुशखबर आहे. ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट्स इंडिया लिमिटेड (Broadcast Engineering Consultant India Limited) मध्ये विविध पदासाठी आठवी पास ते ग्रॅज्युएटपर्यंत उमेदवारांसाठी मोठी भरती होणार आहे.


या पदांसाठी होणार भर्ती

अप्रेंटिस किंवा लोडर (Apprentice or Loader) - एकूण जागा ७३


सुपरवायजर (Supervisor) - एकूण जागा २६


सीनियर सुपरवायजर (Senior Supervisor) - एकूण जागा ४


शैक्षणिक पात्रता

लोडर या पदासाठी आठवी पास असणं आवश्यक आहे. तसेच स्थानिक भाषा आणि हिंदीत संवाद साधता येणं गरजेचं आहे.


सुपरवायजर आणि सीनियर सुपरवायजर या पदांसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून डिग्री घेतलेली असावी. तसेच, संगणकाच्या ज्ञानासह किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.


पगार

लोडर - १४,०१४ रुपये


सुपरवायजर - १८,५६४ रुपये


सीनियर सुपरवायजर - २०,३८४ रुपये


परीक्षा शुल्क

सामान्य, ओबीसी - ७५०


एससी, एसटी, ईडब्ल्यूएस, पीडब्ल्यूडी - ४५०


अर्ज करण्याची शेवटची तारीख

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० जून २०२१ आहे.


अर्ज कसा करावा

www.becil.com या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा