Breaking
जालना : आशा कर्मचारी संपावर ठाम, जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चाजो पर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तो पर्यंत संप सुरूच राहिल


जालना, दि. २१ : आज आशा कर्मचारी संघटनेच्या वतीने  जालना  जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मुख्यमंत्री व आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन दिले.


निवेदनात म्हटले की, आशा वर्कर्स व आरोग्य कर्मचारी संघटना (सीटू) जालना१५ जून २०२१ पासून राज्य व्यापी बेमुदत संप पुकारला आहे. त्यात जालना जिल्ह्यातील आशा वर्कर्स व गट प्रवर्तक सहभागी आहेत. आज संपाचा सातवा दिवस आहे पण अजून आपले सरकारने काहीही दखल घेतली नाही. 


सरकारने मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला नाहीत तर बेमुदत संप चालूच ठेवण्याचा निर्धार  आशा व गटप्रवर्तकांनी केला.■ आशा व गटप्रवर्तकांच्या मागण्या पुढीलप्रमाणे : 


● सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत करा.


● आशा व गटप्रवर्तकाना आरोग्य कर्मचारी म्हणून केले पाहिजे.


● आशाना १८,००० रू. व गटप्रवर्तकाना २२,००० रू. वेतन मिळाले पाहिजे. 


● आशा व गटप्रवर्तकाना प्रतिदिन ३०० रू. कोविड भत्ता मिळाला पाहिजे. 


● आशा व गटप्रवर्तकाना माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा सर्व टप्प्याचा मोबदला मिळाला पाहिजे. 


● कोरोना बाधित आशा व गटप्रवर्तक व त्यांच्या कुटुंबियांना व्हेंटिलेटरसह बेड राखीव ठेवण्यात यावेत.


● अँटीजेनचे टेस्टचे काम आशांवर लादू नये.


● आरोग्य कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास 50 लाखाचा विमा कवच आहे, त्यामध्ये आशा व गटप्रवर्तक यांचा स्पष्ट उल्लेख करावा.


● आरोग्यवर्धिनी समूह मध्ये गटप्रवर्तकना १५०० रू. दरमहा मोबदला द्यावा.


● प्रेरणा प्रकल्प रिपोर्टिंग साठी गटप्रवर्तकना १५०० रू सहामाही भत्ता व स्टेशनरी साठी ३००० रू. वार्षिक रक्कम द्यावी.


◆ आरोग्यसेविका भरतीमध्ये आशा व गटप्रवर्तक ना 50 टक्के आरक्षण मिळावे.  


● आशांना योजनाबाह्य व मोबदला नसलेले काम देऊ नये. 


● दरमहा मोबदल्याची हिशोब पावती आशा व गटप्रवर्तकांना द्यावी. 


यावेळी कॉ. अण्णा सावंत, कॉ. गोविंद आर्दड, मंदाकीनी तीनगोटे, कल्पना आर्दड, मिना भोसले, अजित पंडित यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते मोर्चात उपस्थित होते.

1 टिप्पणी: