Breaking



वन विभागात नोकरीची संधी, आताच अर्ज करा !


नागपूर : महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत विभागीय वन अधिकारी, सहाय्यक वनसंरक्षक, वनक्षेत्र सर्वेक्षक पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. 


■ पदाचे नाव : -विभागीय वन अधिकारी, सहाय्यक वनसंरक्षक, वनक्षेत्र सर्वेक्षक 

■ शैक्षणिक पात्रता :

1. विभागीय वन अधिकारी ( सेवानिवृत्त ) : संगणकीय प्रणालीचे तसेच GIS व GPS बाबतचे आवश्यक ज्ञान व त्याप्रणालीवर काम केल्याचा अनुभव.

2. विभागीय वन अधिकारी ( सेवानिवृत्त ) : वन संवर्धन कायदा 1980 चे संपूर्ण ज्ञान, भूमी अभिलेखा संबंधी माहिती तसेच वृत्तस्तरीय कार्यालय किंवा प्रधान मुख्य वन संरक्षक कार्यालयारील वन संवर्धन कायद्याबाबतची प्रकरणे हाताळण्याचा कमीतकमी 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. 

3. सहाय्यक वनसंरक्षक ( सेवानिवृत्त ) - सहाय्यक वनसंरक्षक या पदावर क्षेत्रीयस्तरीय कामाचा कमीतकमी 5 वर्षाचा अनुभव.

4. वनक्षेत्र सर्वेक्षक ( सेवानिवृत्त ) : वनक्षेत्र सर्वेक्षक या पदावर क्षेत्रीयस्तरीय कामाचा कमीतकमी 5 वर्षाचा अनुभव. 

◆ नोकरीचे ठिकाण - नागपूर

 अर्ज करण्याची पद्धत - ऑफलाईन 

◆ अर्ज पाठविण्याचा पत्ता - अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य, नागपूर वनभवन, तळ मजला, बी - विंग , रामगिरी रोड, लाईन्स, नागपूर - 440001 

◆ अर्ज  पोहोचविण्याची शेवटची तारीख : 18 जून 2021

◆ अधिकृत वेबसाईट : mahaforest.gov.in 


1 टिप्पणी: