Breaking

रोजगार हमी योजनेत कामे समाविष्ट करावी : सुशिलकुमार चिखलेअकोले : भात लागवड (आवणी), वरई व नाचणी लागवड आणि बैल जोडीने नांगरणी ही सर्व कामे रोजगार हमी योजनेत समाविष्ट करुन तातडीने मंजुर करावी, अशी मागणी राजा हरिश्चंद्र बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी पदवीधर संघाचे तालुकाध्यक्ष सुशिलकुमार चिखले यांनी जिल्हा कृषी अधिकारी जगताप यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


जिल्हा कृषी अधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनात सुशिलकुमार चिखले यांनी म्हटले आहे की, आदिवासी भागामध्ये कोरोना संकटामुळे रोजगार बुडाल्यामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे. आदिवासी शेतकऱ्यांवर भात लावणी, नाचणी लावणीचे मोठे संकट उभे राहिलेले आहे. भात लागवडीसाठी मजुराची व नांगरणी करण्यासाठी बैलांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता भासत आहे. त्याचप्रमाणे बैल औताची गरज आहे, काही ठिकाणी ट्रॅक्टरने नांगरणी करण्याची पध्दत आहे. त्यामुळे भात व नाचणी, लागवडीसाठी नाइलाजाने सावकारांकडे कर्जासाठी जाण्याची वेळ येत आहे यावर तातडीने उपाययोजना करण्यात यावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा