Breaking
महाराष्ट्रातील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून जाहीर करावे, राज्यातील पत्रकारांचे अखेर राज्यपालांना साकडं !


मुंबई, दि.१ मे : "महाराष्ट्रातील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून जाहीर करावे, अशी मागणी पत्रकारांच्या विविध संघटनांनी आज महाराष्ट्र पत्र परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.


राज्यपाल कोश्यारी म्हणाले, "पत्रकारांच्या प्रश्नांसंदर्भात आजच आपण राज्य सरकारला पत्र लिहिणार आहे." 

महाराष्ट्रातील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून जाहीर करावे, त्यांचे लसीकरण करावे, पत्रकारांवर व्यवस्थित उपचार व्हावेत. मुंबईत पत्रकारांना लोकल प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, कोरोनाने बळी गेलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी, या मागण्या करण्यात आल्या आहेत.

राज्यातील पत्रकार गेली चार महिने राज्य सरकारकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र सरकार त्याची दखल घेत नसल्याने राज्यातील पत्रकारांमध्ये मोठा असंतोष आहे. पत्रकारांनी मेल पाठवा आंदोलन केले, आत्मक्लेष आंदोलन केलं, जवळपास बारा मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहून पत्रकारांना फ़न्टलाईन वर्कर म्हणून जाहीर करावे अशी मागणी केलेली आहे तरीही राज्य सरकार पत्रकारांच्या मागण्यांची उपेक्षा करत असल्याचे संघटनांनी म्हटले आहे.

मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए, बीयुजे आदि संघटनांनी आज राज्यपालांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. राज्यात 140 पत्रकारांचे कोरोनानं निधन झाले, पत्रकारांच्या दोनशेवर नातेवाईकांचे निधन झाले, मृतांमध्ये तरूण पत्रकारांची संख्या अधिक असल्याचे वास्तव राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तयांनीही चिंता व्यक्त केली.

आज राज्यपालांना भेटलेल्या शिष्टमंडळात मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर, टीवहूजेएचे अध्यक्ष विनोद जगदाळे, मराठी पत्रकार परिषदेचे विश्‍वस्त किरण नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, नवराष्टचे संपादक राजा आदाटे, दीपक कैतके, स्वप्नील नाईक हे उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा