Breaking


जुन्नर : तालुक्यात आढळले ८३ कोरोनाचे रुग्ण तर एका व्यक्तीचा मृत्यू



जुन्नर : जुन्नर तालुक्यातील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत नाही, आज तालुक्यात पुन्हा ८३ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर एका व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या तालुक्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ५९३ झाली असून आता पर्यंत ५७२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


आज खोडद ११, नारायणगाव ८, ओतुर ८, शिरोली बु. ५, पिंपरी पेंढार ४, डिंगोरे ४, आगर ४, करंजाळे ३, उदापुर ३, आळे २, आळेफाटा २, बारव २, खानगाव २, बेल्हे २, मांदारणे २, पिंपळवंडी २, हापुसबाग २, खामगाव १, कोळवाडी मढ १, पारगाव तर्फे आळे १, धनगरवाडी १, धोलवड १, डुंबरवाडी १, उंब्रज नं. १- १, कांदळी १, कुरण १, शिरोली खु. १, पिंपळगाव आर्वी १, जुन्नर नगरपरिषद ६ असे एकूण ८३ रुग्ण आढळले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा