Breakingजुन्नर : ओबीसी आरक्षणासाठी जुन्नर तालुका भाजपा आक्रमक, आळेफाटा येथे चक्काजाम आंदोलन


आळेफाटा : आज शनिवार दि.२६ जून रोजीच्या राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून भारतीय जनता पार्टी जुन्नर तालुका च्या वतीने तालुकाध्यक्ष संतोष तांबे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष रामदास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आळेफाटा येथील मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्यातील आघाडी सरकार विरोधात कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली.


ठाकरे सरकार राज्यात अस्तित्वात आल्यापासून सर्वच समाज घटकांवर अन्याय करत आहे. मराठा आरक्षण, पदोन्नतीमधील आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षण या सर्व मुद्द्यांवर राज्यातील आघाडी सरकार अपयशी ठरल्याची टीका तालुकाध्यक्ष संतोष तांबे यांनी केली. काहीही झाले तरी ओबीसींचे राजकीय आरक्षण राज्य सरकारला द्यावेच लागेल अन्यथा भाजपा निवडणुकाच होऊन देणार नाही असे रामदास शिंदे यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा सचिव रोहिदास भोंडवे, तालुका सरचिटणीस मयुर तुळे, संपर्कप्रमुख नवनाथ हांडे, निलेश गायकवाड, महिला मोर्चाच्या नेत्या सुनंदा गाडगे, संजीवनी हांडे, डाॅ.दत्ता खोमणे, अॅड.दत्ता भागवत, जुन्नर शहराध्यक्ष गणेश बुट्टे पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष प्रतिक जाधव, सचिन शिंदे, रोहिदास कोल्हाळ, अमोल कोल्हाळ, उपाध्यक्ष दत्तात्रय डुंबरे, रमेश वायकर, संदिप गडगे, सुभाष तांबे, ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी उमेश गोसावी, ज्ञानेश्वर शिंदे, वसंत माळवी, शंकर शिंदे, केदार बारोळे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा